नो पार्किंगमधील गाडीचा फोटो पाठवा आणि पैसे कमवा!

नवी दिल्ली | नो पार्किंगमधील किंवा बेशिस्त पद्धतीने पार्किंग केलेल्या गाडीचा फोटो पाठवणाऱ्या व्यक्तीला दंडातील 10 टक्के रक्कम मिळणार आहे. केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ही घोषणा केली. 

दिल्लीतील नितीन गडकरी यांच्या कार्यालयाबाहेर त्यांना बेशिस्त पद्धतीने पार्क केलेल्या गाड्या दिसल्या. त्यामुळे त्यांनी हा निर्णय घेतला. 

बेशिस्त पद्धतीने पार्क केलेल्या गाडीला 500 रुपयांचा दंड आकारला जातो. म्हणजेच एका गाडीमागे फोटो पाठवणाऱ्याला 50 रुपये मिळू शकतात.