Top News

देशातील लॉकडाऊन वाढणार का? नितीन गडकरी म्हणतात…

Loading...

मुंबई | कोरोना संसर्ग रोखण्यासाठी देशभरातील लॉकडाऊनचा कालवधी 14 एप्रिलनंतर 3 मेपर्यंत वाढवण्यात आला. मात्र आता पुन्हा एकदा 3 मेनंतरही लॉकडाऊन वाढणार की नाही याविषयी चर्चा सुरु आहे. यावर भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाष्य केलं आहे.

ज्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण सापडत आहेत, ते ठिकाण सील करुन तेथे रुग्णांची संख्या कमी होईपर्यंत काळजी घेतली पाहिजे. मात्र सरसकट सर्व जिल्ह्यांना शहरांना एकच नियम लावून बंद करणं चांगलं होणार नाही, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

जेथे कोरोनाचे रुग्ण नाहीत तेथे कसं वागायचं कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची यावर लक्ष दिलं पाहिजे. सुरुवातीला लोकांमध्ये खूप निष्काळजीपणा होता, पण आता लोक काळजी घेताना दिसत आहेत. लोक जागरुक झाले आहेत. लोक नक्की नियम पाळतील, असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अगदी योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळेच कोरोनाचा संसर्ग थांबला आहे, असं नितीन गडकरी म्हणाले आहेत.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

पॅरोलवर बाहेर आलेल्या कुख्यात डॉन अरुण गवळीची गरजूंना मदत, पाहा व्हिडीओ

‘भारतीय मनाने कणखर असून त्यांचं मनोबलच कोरोनावर मात करेल’; चीनमधील तज्ञांकडून कौतुक

Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या