Top News देश

आम्ही शेतकऱ्यांच्या सल्ल्यांवर विचार करायला तयार आहोत पण…-नितीन गडकरी

नवी दिल्ली | राजधानी दिल्ली येथे केंद्राच्या कृषी आंदोलनाला आज 19 वा दिवस आहे. कायदे रद्द झाले पाहिजते अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अशात केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी शेतकरी आंदोलनावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

आम्ही शेतकऱ्यांच्या सल्ल्यांवर विचार करायला तयार आहोत पण असे काही घटक आहेत जे शेतकरी आंदोलनाचा फायदा घेत त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत असल्यातं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे.

आमचं सरकार शेतकऱ्यांसाठी समर्पित आहे. काही घटक आंदोलनाचा फायदा घेत आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी कायदे समजून घेण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही गडकरींनी शेतकऱ्यांना केलं आहे.

आम्ही शेतकऱ्यांच्या विरोधात काहीहह केलं नाही. त्यांनी पिकवलेलं उत्पादन मंडीमध्ये,व्यापाऱ्यांना इतर कोणत्याही ठिकाणी विकण्याचा अधिकार त्यांना आहे. संवाद झाला तर हे प्रकरण सुटेल आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल, असंही गडकरी म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

“शेतकरी आंदोलन तुकडे तुकडे गँगने हायजॅक केलं, काँग्रेस शेतकऱ्यांचं भलं करू शकत नाही”

महाराष्ट्रात आणीबाणी आहे की नाही हे जनता ठरवेल- संजय राऊत

“…तर या नटीबाईची भाजप कार्यालयात खणा-नारळाने ओटी भरावी!”

“…तर फेकूचंद पडळकरांना त्यांच्या ढोलासह तुरुंगात टाकले असतं”

अहमद भाईंमुळे अनेकांचा शपथविधी झाला, त्यांनी अनेकांना मुख्यमंत्री, मंत्री बनवलं- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या