बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

सायरस मिस्त्रींच्या निधनानंतर नितीन गडकरींचा मोठा निर्णय!

नवी दिल्ली | 4 सप्टेंबर रोजी टाटा समूहाचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये त्यांचं निधन झालं.

सात एअरबॅग्ज असलेल्या सुरक्षित मर्सिडीजमध्ये असूनही केवळ सीटबेल्ट न लावल्यामुळे मिस्त्री यांचा मृत्यू झाला, असं समोर आलं आहे. यामुळेच आता केंद्र सरकार गाडीमधल्या सीटबेल्ट संबंधित मोठा निर्णय घेतला आहे.

कारच्या पहिल्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना सीटबेल्ट लावणं अनिवार्य आहेच. मात्र कारच्या मागे बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक असेल. विशेष म्हणजे सीट बेल्ट न लावणाऱ्यांविरोधात चलान कापलं जाईल.

कारमधील प्रत्येक प्रवाशाला आता सीटबेल्ट लावणे बंधनकारक असणार आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली. वाहनात मागच्या बाजूला बसणाऱ्या प्रवाशांनाही सीटबेल्ट लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे, असं गडकरी म्हणाले.

आता कारमधील प्रत्येकाला सीट बेल्ट घालणे बंधनकारक असेल. सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर, आज सरकारने मागच्या सीटवरील प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. मागच्या सीटसाठीही सीट बेल्ट आवश्यक आहेत, असं नितीन गडकरी म्हणाले.

दरम्यान, मिस्त्री यांच्या पोस्टमॉर्टम रिपोर्ट (cyrus mistry post mortem report)नुसार छाती, डोके, मान आणि मांडीला गंभीर दुखापत झाल्याचं प्राथमिक अहवालात स्पष्ट झालं आहे. मिस्त्री यांना पॉलीट्रॉमा होता जो एखाद्या व्यक्तीला गंभीर अंतर्गत जखमा झाल्यास होतो.

मिस्त्री यांच्या अपघातानंतर सरकारने गंभीर दखल घेत याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मिस्त्री प्रवास करत असलेल्या मर्सिडीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनीही या गाडीची पाहणी केली.

चारोटी नाक्याजवळील सूर्या नदीच्या पुलाच्या कठडयाला त्यांच्या भरधाव कारची धडक बसल्याने मागील सीटवर बसलेल्या मिस्त्री आणि जहांगीर पंडोल यांचा मृत्यू झाला.

ठाकरेंना घेरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा प्लॅन, ठाकरेंची अडचण वाढणार?

मान, पाठ, छाती सगळंच उघडं… लोक कमेंटमध्ये म्हणतात, “हिनं झाकलंय तरी काय?”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More