मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या शिवतीर्थावरील भाषणाने गुडीपाडव्याचा दिवस गाजला. राज ठाकरेंनी त्यांच्या भाषणात महाविकास आघाडीवर (Mahavikas Aghadi) सडकून टीका केली तर भाजपवर (BJP) टीका करणं मात्र टाळलं. त्यात रविवारी जेष्ठ भाजप नेते व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी राज ठाकरेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली.
नितीन गडकरी यांनी आपल्या दौऱ्यात बदल करत राज ठाकरेंच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. राज ठाकरे व नितीन गडकरी यांच्या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. शिवतीर्थावरील या भेटीत मनसे (MNS) व भाजपच्या युतीची चर्चा झाली का? असा सवाल उपस्थित होत असताना नितीन गडकरींनी या भेटीमागचं कारण स्पष्ट केलं आहे.
ही राजकीय भेट नव्हती. ही पूर्णपणे व्यक्तीगत आणि पारिवारीक भेट असल्याचं नितीन गडकरी म्हणाले. माझे राज ठाकरे आणि त्यांच्या परिवाराशी गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. त्यांच्या आईची प्रकृती बघायची होती. त्यांचं नवं घर पाहायला बोलावलं होतं. त्यामुळे मी आज त्यांच्या भेटीला आलो, असं स्पष्टीकरण नितीन गडकरींनी दिलं.
दरम्यान, राज ठाकरे आणि माझे संबंध गेल्या 30 वर्षांपासून आहेत. त्यामुळे आजच्या भेटीचा राजकारणाशी कोणताही संबंध नाही, असंही गडकरी म्हणाले. मात्र, राज ठाकरे व नितीन गडकरींच्या भेटीनंतर भाजप-मनसेच्या युतीच्या चर्चा रंगल्या असून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
थोडक्यात बातम्या-
कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे ‘या’ ठिकाणी लॉकडाऊन जाहीर
‘अमित ठाकरेंना हनुमान चालीसा म्हणायला लावा’; सुजात आंबेडकरांचं खुलं आव्हान
‘देवेंद्र भाऊ तुम्ही अॅडजस्ट करून घेतलं तर…’, अशोक चव्हाणांचा फडणवीसांना टोला
S.T Strike| एसटी कर्मचाऱ्यांना अजित पवारांचं पुन्हा आवाहन, म्हणाले…
“राज ठाकरेंच्या तुंबलेल्या मोरीतून भाजपचं गांडूळ बाहेर निघालं”
Comments are closed.