“ज्या देशात रनौत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो, त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच”
मुंबई | देशातील आर्थिक परिस्थितीमुळे सध्या केंद्र सरकारवर विरोधकांकडून मोठ्या प्रमाणात टीकेची झोड उठल्याचं पाहायला मिळत आहे. कोरोनाकाळात भारताच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडल्याचं गंभीर चित्र पाहायला मिळालं.
भारताच्या अर्थव्यवस्थेला खिळ बसली असतानाच महाराष्ट्र काँग्रेसचे नेते तसेच ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. “ज्या देशात रघुराम राजन आणि अभिजित बॅनर्जी यांना नक्षलवादी ठरवलं जातं. तसेच जिथे रनौत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो त्या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच”, असा खोचक टोला नितीन राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून अर्थव्यवस्थेवरून विरोधी पक्षाने केंद्र सरकारला चांगलेच लक्ष केल्याचं दिसून येत आहे. भारताची अर्थव्यवस्था कोलमडलेली असताना विरोधकांच्या हातात मात्र आयतं कोलीत सापडल्याने टीकेची एकही संधी ते सोडताना दिसून येत नाहीत.
नितीन राऊत यांनी काही वेळापूर्वी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधत कंगना रनौत आणि बाबा रामदेव यांना या देशात सन्मान मिळतो आणि रघुराम राजन तसेच अभिजीत बॅनर्जी यांना नक्षलवादी ठरवलं जातं. मग या देशाचा जीडीपी वजा 7.3 जाणारच, असं म्हणत केंद्रावर टीकास्त्र डागलं आहे.
ज्या देशात रघुराम राजन आणि अभिजित बॅनर्जी यांना नक्षलवादी ठरवलं जातं,
जिथे राणावत आणि रामदेव यांना सन्मान मिळतो,
त्या देशाचा जीडीपी वजा ७.३ जाणारच!
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) June 1, 2021
थोडक्यात बातम्या –
ठाकरे सरकारमधील मंत्र्याचा डायरी घोटाळा?; आणखी एक मंत्री अडचणीत येण्याची शक्यता
धक्कादायक! कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत 1 कोटीहून अधिक भारतीय बेरोजगार
तिने भररस्त्यात स्वत:चे कपडे फाडून घेत दिली धमकी, चिडलेल्या प्रियकराने उचललं टोकाचं पाऊल
…म्हणून देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांची भेट घेतली- चंद्रकांत पाटील
लाॅकडाऊनमुळे कोरोनाच नाही तर अन्य आजारांपासूनही लोकांचे जीव वाचले; संशोधनातून माहिती समोर
Comments are closed.