बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नागरिकांसोबत मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही’; नितीन राऊतांचा अधिकाऱ्यांना दम

बीड | एखादा अधिकारी नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल तर त्यांची मग्रुरी खपवून घेतली जाणार नाही, असा दम ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत हे मराठवाडा दौऱ्यावर आहेत. त्यांनी ऑक्सिजन प्लांटची पाहणी केली. यानंतर राऊतांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.

कोरोना काळात नागरिकांची मोठी गैरसोय झाली आहे. मात्र सरकार म्हणून नागरिकांसह शेतकऱ्यांना दिलासा देण्याचे काम सरकारने केले आहे. यामुळे एखादा अधिकारी जर नागरिकांसोबत मग्रूरपणे वागत असेल, तर अशा अधिकाऱ्यांना खपवून घेणार नाही, असं राऊत म्हणालेत.

सर्व ग्राहकांना विनातक्रार वीज वितरण सेवा देताना कोणत्याही प्रकारचा विलंब होणार नाही याची दक्षता घ्यावी. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर उद्भवणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्या तातडीने सोडवण्याच्या दृष्टीने अधिक यंत्रणांनी तयार राहावं, असे आदेश नितीन राऊत यांनी यावेळी दिले.

दरम्यान, बीड, परभणी येथे ऑक्सिजन प्लांट निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. या प्लांटचे काम व्यवस्थित सुरू आहे की नाही हे पाहण्यासाठी मी हा दौरा केला. अनेक समस्या असतात. पण या समस्यांचे निराकरण जितक्या चांगल्या पद्धतीने करता येईल, तो करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं नितीन राऊत म्हणालेत.

थोडक्यात बातम्या- 

“चीनच्या कपटनीतीवर लक्ष ठेवावंच लागेल, गाफील राहून चालणार नाही”

पुण्याचा श्वास आणखी थोडा मोकळा होणार; वाचा 14 जूनपासून काय सुरु, काय बंद?

सहकारमहर्षी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी शिवाजीराव तुकाराम नाडे यांचं निधन

“काँग्रेसमध्ये आता सर्वसामान्य कार्यकर्त्याला आमदार बनवलं जाईल”

कौतुकास्पद! कोरोनामुळं अनाथ झालेल्या मुलांची शैक्षणिक जबाबदारी घेण्याचा जगताप दाम्पत्याचा निर्णय

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More