बिहारमध्ये राजकीय बहार, नितीश कुमारांना भाजपचा पाठिंबा

पाटणा | नितीश कुमार यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपने त्यांना पाठिंबा दिला आहे. आज सकाळी १० वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे.

आज संध्याकाळी ५ वाजता शपथविधी ठेवण्यात आला होता. मात्र बिहारमधल्या राजकीय घडामोडी पाहता शपथविधीची वेळ बदल्यात आली.

दरम्यान, आज फक्त नितीश कुमार आणि भाजपचे सुशील मोदी शपथ घेणार असल्याचं समजतंय. तसंच नव्या मंत्रिमंडळात दोन्ही पक्षांचे १३-१३ मंत्री असतील.