मी छोट्या पक्षाचा नेता, पंतप्रधान बनण्याची क्षमता नाही- नितीशकुमार

nitish kumar
नितीश कुमार

पाटणा | मी एका छोट्या पक्षांचा नेता आहे,  २०१९ साली मी पंतप्रधानपदाचा उमेदवार नसेल, असं बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटलंय. पाटण्यात आयोजित लोकसंवाद यात्रेत ते बोलत होते.

यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्तुतीही केली. कुणालं वाटलं नव्हतं मोदी पंतप्रधान होतील, मात्र लोकांनी त्यांच्यात पंतप्रधान पाहिला, असं नितीशकुमार म्हणाले. मला बिहारचा कारभार पाहण्यासाठी जनाधार मिळाला असून मी तेच करत राहील, असंही ते म्हणाले.