नितीश कुमारांची कळी खुलली, विश्वासदर्शक ठराव जिंकला!

पाटणा | बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. नितीश कुमारांच्या बाजूने १३१ मतं पडली तर विरोधी बाजूला १०८ मतं मिळाली.

विश्वासदर्शक ठरावाआधी माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी नितीश कुमारांना विश्वासघातकी म्हणत त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. तसेच भाजप आणि जेडीयूने हे सर्व कारस्थान पूर्वतयारी करुन केल्याचा आरोपही त्यांनी लावला. त्यानंतर नितीश कुमारांनी काँग्रेसचे नेते अहंकारी असल्याचं म्हटलं.

दरम्यान, आरजेडीने याप्रकरणी न्यायालयात धाव घेतली असून त्यांच्या याचिकेवर सोमवारी सुनावणी होणार आहे.

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या