बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भाजपचा एकही आमदार फुटला नाही, म्हणूनच दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न”

मुंबई | काँग्रेस पक्षाचे नेते आणि खासदार राहुल गांधी यांचा 19 जून रोजी वाढदिवस होता. त्या दिवशी भाजपचे मोठे नेते भाजपला रामराम ठोकत काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत, असं सांगितलं जात होतं. त्यावर आता भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसमध्ये सुरु असलेल्या पक्षप्रवेशावरुन काँग्रेसला टोला लगावला आहे.

मी 16 जानेवारी 2021 ही तारीख दिली होती की, भाजपचा एक तरी आमदार फोडून दाखवा, ते शक्य झालं नाही म्हणून आता दुधाची तहान ताकावर भागवण्याचा प्रयत्न सुरू आहे, अशी टीका सुधीर मुनंगटीवार यांनी केली आहे. नोव्हेंबर महिन्यात निवडणुका आहेतच त्यावेळी भाजपची ताकद दिसेल, असंही मुनगंटीवार म्हणाले.

राज्यातील 150 विषय आहेत ज्यावर चर्चा होऊ शकते त्यामुळे आता विधिमंडळाचं अधिवेशन किमान 4 आठवड्यांचं झालं पाहिजे. थातुरमातुर काही दिवसांचे अधिवेशन नको, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत. नवी मुंबईच्या विमानतळाच्या नावावरून संघर्ष होईल, अशी भूमिका कोणी घेऊ नये, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

दरम्यान, भाजपाने शिवसेनेसोबत 30 वर्ष साथ दिली. शिवसेनेने आमची युतीत 25 वर्ष सडली, अशी घोषणा केली तरीही आम्ही विचार केला आणि त्यांना सोबत घेतलं. केंद्रीय तपास यंत्रणेमध्ये सुद्धा स्वाभिमानी अधिकारी आहेत.  25 वर्षांपासून देशाची सेवा करत आहेत. अशा प्रसंगात तपास यंत्रणेला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणे योग्य नाही, असंही मुनगंटीवार म्हणाले.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थोपण्यास राज्यसरकार सज्ज; मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ महत्वाच्या सुचना

मुलाला शाळेत प्रवेश मिळाला नाही, म्हणून मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा गृहविभागाला ई- मेल अन्…

शिवसेना भाजपसोबत जाणार नाही- बाळासाहेब थोरात

चिंता वाढली! कोरोनाच्या घातक ठरलेल्या डेल्टा प्लस विषाणूचे या जिल्ह्यांत सापडले रूग्ण

बापमाणूस! लेकीच्या ‘ऑनलाईन क्लास’साठी मुसळधार पावसात छत्री घेऊन राहिला उभा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More