बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केलं तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही”

मुंबई | शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी आजच्या सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर सडकून टीकास्त्र सोडलं आहे. अनिल देशमुखांपासून अनिल परब, प्रताप सरनाईक, रोहित पवार, अजित पवारांवर कारवाया करून महाराष्ट्र सरकारची कोंडी करता येईल या भ्रमात विरोधी पक्षाचे भोपळे आहेत. या भोपळ्यांनी कितीही टुणूक टुणूक केले तरी सत्तेचा सोपान त्यांना पार करता येणार नाही, अशी बोचरी टीका राऊतांनी केली आहे.

सरकार पक्षावर आरोपांच्या फैरी झाडून नामोहरम करणे हे विरोधी पक्षाचे कर्तव्यच आहे, पण त्या आरोपांत थोडे तरी तथ्य असायला हवे. महाराष्ट्रापुढे जे प्रश्न आहेत त्यातले अर्ध्याहून जास्त प्रश्न केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळेच निर्माण झाले आहेत. मराठा आरक्षण आणि ओबीसींचे राजकीय आरक्षण हे तर पूर्णपणे केंद्र सरकारनेच हाताळायचे व निर्णय घ्यायचे विषय आहेत. या प्रश्नी राज्याच्या विधानसभेत गोंधळ घालून काय साध्य होणार?, असा सवाल शिवसेनेनं भाजप नेत्यांना केलाय.

सरकारला कोंडीत पकडण्यासाठी म्हणे जोरदार रणनीती ठरवली जाते. ही रणनीती म्हणजे काय, तर सरकारला बोलू द्यायचे नाही. सभागृहात गोंधळ घालून कामकाज बंद पाडायचे. विधानसभा अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत घुसून घोषणाबाजी करायची. हीच रणनीती यावेळीही ठरलेली दिसते. महाराष्ट्रातील विरोधी पक्ष दोन दिवसांच्या पावसाळी अधिवेशनात यापेक्षा वेगळे काही करील अशी सुतराम शक्यता दिसत नाही, असंही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलंय.

मराठा आरक्षणप्रश्नी राज्य सरकारची कोंडी करण्याची खुमखुमी विरोधी पक्षाला असेल तर मराठा समाजाचे गुन्हेगार म्हणून केंद्र सरकारलाही मोकळे सोडता येणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे.

थोडक्यात बातम्या- 

स्वत:ला हिंदू नाही तर भारतीय म्हणा, सगळ्यांचा DNA एकच- मोहन भागवत

पावसाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात; सरकार मांडणार ‘हे’ 3 मुख्य प्रस्ताव

मी आणखी 25 वर्षे तरी राजकारणात राहणार- देवेंद्र फडणवीस

‘दिरंगाईचा खेळ कायमचा थांबवा’; अमित ठाकरे संतापले

चिंता वाढली! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकड्यात वाढ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More