बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राजकारण आता व्यापार झालाय, खऱ्याच्या बाजूने कोणीही बोलत नाही”

शिलाँग | आपल्या लोकशाहीमध्ये राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. सध्या देशात मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक याचं नाव प्रचंड गाजत आहे. गेल्या काही दिवसांपासून मलिक यांनी सातत्यानं केंद्र सरकारच्या विरोधात भूमिका घेतली आहे. आताही मलिक यांनी गोवा सरकारवर जोरदार टीका केली आहे.

सोमवारी मलिक यांनी गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. परिणामी सध्या त्यांच्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे. सध्या सत्याच्या बाजूनं उभारायला कोणी तयार नाही. सत्याच्या बाजूनं उभारायची हिम्मत करायला कोणीच तयार नाही, असंही मेघालयचे राज्यपाल मलिक म्हणाले आहेत. मलिक यांच्या आरोपानंतर भाजपवर सर्व विरोधक टीका करत आहेत.

रामनारायण लोहिया आणि चरण सिंह यांच्या राजकारणाचा दाखला देत मलिक यांनी आजच्या राजकारणावर जोरदार टीका केली आहे. तेव्हाचं राजकारण करावं वाटायचं पण आज राजकारण व्यापार झालं आहे खरतर व्यापाराच्या सुद्धा पुढं गेलं आहे, अशी खंत सुद्धा मलिक यांनी बोलताना व्यक्त केली आहे. केंद्रातील मोदी सरकावर टीका करत असताना आता मलिक यांनी भाजपची सत्ता असलेल्या गोवा सरकारवर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानं सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, मलिक यांनी काही दिवसांपूर्वी शेतकरी आंदोलनावरून उत्तर प्रदेश सरकारवर सुद्धा टीका केली होती. लखीमपूर घटनेचा मलिक यांनी निषेध सुद्धा व्यक्त केला होता. आतातर थेट गोव्यातील भ्रष्टाचाराबाबत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लक्ष घालण्याची विनंती सुद्धा मलिक यांनी केली आहे.

थोडक्यात बातम्या 

“महाराष्ट्रात होणाऱ्या छाप्यांमागे देवेंद्र फडणवीसांचा हात”

“…मग आर्यन खान दोषी कसा? त्याला पकडणं हा एक ट्रॅप”

एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड! महागाई भत्त्यासह ‘दिवाळी भेट’ही मिळणार

“त्यांना अटक करू नये, त्यांना व्यसनमुक्ती केंद्रात पाठवावं”

“विराटने खेळभावनेने पराभव स्वीकारला, मला त्याचं कौतुक वाटतंय”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More