बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नोबेल पुरस्कार विजेते कैलाश सत्यार्थींनी अफगाण मुलींबाबत केलं मोठं वक्तव्य; म्हणाले…

नवी दिल्ली | तालिबानची अफगाणिस्तानमध्ये सत्ता आल्यानंतर तेथील महिलांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. अफगाणिस्तानमधील महिलांवर तालिबानने अनेक निर्बंध लादले आहेत. त्यामुळे या घटनेकडे साऱ्या जगाचं लक्ष लागून आहे. याच पार्श्वभूमीवर बालकामगार कार्यकर्ते आणि नोबेल शांतता पुरस्कार विजेते कैलाशी सत्यार्थी यांनी अफगाण मुलींबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

जागतिक समुदायाने तालिबान्यांना सांगायला हवं की, जर तालिबानने महिला आणि मुलींना शिक्षण घेण्याची परवानगी दिली तरच त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवर सहाय्यता आणि मान्यता मिळणार असल्याचं कैलाश सत्यार्थी यांनी म्हटलं आहे.

जर मुलांना शिक्षण दिलं गेलं नाही, तर शाश्वत शोषण, अन्याय आणि हिंसाचाराचा धोका संभवू शकतो. त्याचबरोबर तालिबान्यांनी अफगाणिस्तानमध्ये शाळा सुरू केली. मात्र वर्गात केवळ मुले आणि पुरूष शिक्षकांना परत बोलावलं आहे. यावरून हे सूचित होते की इस्लामी गट मुली आणि महिला शिक्षकांना परत आणू इच्छित नाही, अशी चिंता कैलाश सत्यार्थी यांनी ‘द हिंदूला’ दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केली आहे.

दरम्यान, तालिबानला आर्थिक तसेच राजकीय पाठिंबा मिळवायचा आहे. त्याच बरोबर त्यांना अनेक देशांकडून आणि आंतरराष्ट्रीय समुदायाकडून मान्यता देखील मिळवायची आहे. परंतु मला आशा आहे की ते मुली आणि महिलांसाठी सौम्य भूमिका घेतील आणि तेव्हाच आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या मदतीचा हात पुढे करेल, असंही कैलाश सत्यार्थी म्हणाले.

थोडक्यात बातम्या- 

‘देवांचा देव तु गंमपती…’; चिमुकलीने बोबड्या आवाजात धरलेल्या सुराचा व्हिडीओ तुफान व्हायरल!

‘आम्ही बेडरूममध्ये असायचो तेव्हा…’; शरीरसंबंधाबाबत महिलेने पतीविरोधातच केली पोलिसात तक्रार!

‘शरद पवारांंना ‘तो’ अधिकार नाही कारण…’ ; सुधीर मुनगंटीवारांचा ठाकरे सरकारवर निशाणा

‘…तर मी तुमचा ‘चड्ढा’ उतरवेल’; नवज्योत सिद्धूंवर केलेल्या ‘त्या’ टीकेमुळे राखीचा चढला पारा!

माही मार रहा है! सराव सामन्यातच धोनीने मारले अर्धाडझनभर षटकार, पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More