‘या’ कारणामुळं उत्तर कोरियानं थेट संयुक्त राष्ट्रांनाच दिली धमकी!
नवी दिल्ली | उत्तर कोरियाने क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. याकारणामुळे संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून तातडीची बैठक बोलावण्यात आली. अमेरिका ,फ्रान्स आणि इंग्लंड यांच्या विनंतीवरून ही बैठक बोलावण्यात आली होती. त्यावरून आता उत्तर कोरियाकडून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला इशारा देण्यात आला आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने उत्तर कोरियात आण्विक शस्त्रास्त्रांची चाचणी करत असल्याने चिंता व्यक्त केली होती. उत्तर कोरियातील क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांवर बंदी घालण्यात यावी, असं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने एका प्रस्तावात म्हटलं आहे. यामुळे आता उत्तर कोरिया संतापला असुन संयुक्त राष्ट्रांना इशारा दिला आहे. उत्तर कोरियाच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी जो चोल सु यांनी हा इशारा दिला आहे.
उत्तर कोरियाच्या सार्वभौमत्वावर अतिक्रमण करण्याच्या प्रयत्नांचे भविष्यात काय परिणाम होऊ शकतात हे समजायला हवे, असा इशारा जो चोल सु यांनी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेला दिला आहे. तसेच जो चोल सु यांनी संयुक्त सुरक्षा परिषदेवर दुटप्पीपणाचा आरोप देखील केला आहे.
दरम्यान, उत्तर कोरिया नवनविन क्षेपणास्त्रांची चाचणी करत असल्यामुळे अमेरिका, फ्रान्स आणि इंग्लंड चिंता व्यक्त करत आहेत.परंतु, किम जोंगने अमेरिकेच्या लष्करी धोरणाचा धोका अजुनही कायम आहे असं म्हटलं होत. जोपर्यंत हे राष्ट्र तिरस्काराच्या धोरणाची भुमिका बदलणार नाही तोपर्यंत बोलणी करणार नाही, असंही किम जोंग म्हणाला आहे.
थोडक्यात बातम्या –
#Facebookdown | फेसबुक, इन्स्टाग्राम मेसेंजरसह व्हॅाट्सअपची सेवा ठप्प!
“आमचे 20 आमदार कमी पडले, जर आम्ही धोका झाला असता तर…”; चंद्रकांत पाटलांचं शिवसेनेवर टीकास्त्र!
“निवडणुकीत लक्ष्मी आली की दरवाजा उघडून घ्या पण, मतदान भाजपलाच करा”
‘उत्तर प्रदेश हे नवं जम्मू काश्मीर आहे’; माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांचं टीकास्त्र!
Comments are closed.