बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

बाबर-रिझवान नव्हे, तर पाकचा ‘हा’ खेळाडू भारताला डोकेदुखी ठरू शकणार???

मुंबई | विश्वचषकमधील सर्वात रोमांचक सामना आज भारत-पाक या दोन्ही संघामध्ये होत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर पाकिस्तान संघाने बाबर आझमकडे कर्णधारपद सोपवलं आहे. या सामन्यात भारताचे पारडे जड मानले जात असले तरी पाकिस्तानचा एक फलंदाज या सामन्यासाठी भारतासाठी डोकदुखी ठरू शकणार आहे.

बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान या पाकिस्तानच्या सलामी जोडीने 2021 मध्ये टी-20 सामन्यांमध्ये सर्वात जास्त धावा काढल्या आहेत. त्यांनी मोठ्या स्ट्राईक रेटने धावा काढल्या आहेत. मात्र भारतासाठी पाकिस्तानचा डावखूरा फलंदाज फखर झमान सर्वात धोकादायक ठरू शकण्याची शक्यता आहे. कारण त्याने भारताविरूद्ध दमदार कामगिरी केली आहे.

2017 साली झालेल्या चॅम्पियन ट्रॉफीमध्ये फखर झमानने भारताविरुद्ध दमदार शतक झळकवले होते. या खेळीत त्याने 12 चौकार आणि 3 षटकाराच्या साहाय्याने 114 धावा काढल्या होत्या. त्यामुळे हा सामना पाकिस्तानने 180 धावांनी जिंकला होता.

दरम्यान, वेस्ट इंडिज विरुद्ध सराव सामन्यातही फखर झमान चमकला आहे. त्यावेळी त्याने 52 चेंडूत 98 धावांची ताबडतोड खेळी केली होती. तसेच पीएसएलमध्येही फखरने 10 सामन्यात 287 धावा चोपल्या आहेत. त्यामुळे भारतीय गोलंदाजांना फखर झमानला लवकरात लवकर बाद करण्याचं मोठं आव्हान असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

‘या’ समस्यांना मुळासकट उखडून फेकावं लागेल; उस्मानाबादमधील ‘त्या’ घटनेवरून चाकणकर कडाडल्या

उस्मानाबादच्या डान्स बारवरून अमोल मिटकरी आक्रमक, म्हणाले…

टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराटचा पाकविरूद्ध जबरदस्त विक्रम! आजच्या सामन्यात मोठा धमाका करणार

भारत पाकिस्तान सामन्यापुर्वी शाहिद आफ्रिदीच्या मनात चलबिचल, म्हणाला… 

आर्यन खान प्रकरणात खळबळ माजवणारा तो व्हिडीओ संजय राऊतांकडून शेअर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More