बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“एक हजार पाकिस्तानही लतादीदींच्या जाण्याची पोकळी भरुन काढू शकत नाही”

नवी दिल्ली | भारतरत्न, महागायिका लता मंगेशकर यांचं वयाच्या 92 व्या वर्षी दुख:द निधन झालं. लतादीदींच्या निधनानं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात शोककळा पसरली आहे. पाकिस्तानमध्येही लता मंगेशकर यांना श्रध्दांजली वाहण्यात आली आहे.

“एक हजार पाकिस्तानही लतादीदींच्या जाण्याची पोकळी भरुन काढू शकत नाहीत”, असं पाकिस्तानी लष्करप्रमुख जनरल कमर बाजवा यांचे वैयक्तिक सल्लागार असल्याचा दावा करणाऱ्या ‘झैदू’ यांनी म्हटलं आहे. याविषयी त्यांनी ट्विटरवर एक पोस्टही शेअर केली आहे.

पाकिस्तानचे राजकीय विश्लेशक डॉ. शाहिद मसूद यांनीही लतादीदींना “आमची प्रिय बहिण” असं संबोधत श्रध्दांजली वाहिली आहे. लता मंगेशकर यांच्या निधनावर पाकिस्तानी गायिका हुमैरा अर्शद आणि अभिनेता इम्रान अब्बास यांनीदेखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. लतादीदींचं जाणं हा “एका युगाचा अंत” असं म्हणत पाकिस्तानचे माहीती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनीही लतीदीदींना श्रद्धांजली अर्पण केली.

दरम्यान, मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये लतादीदींवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. शिवाजी पार्क येथे लता मंगेशकर यांचं स्मारक उभारण्याची मागणी भाजपकडून केली जात आहे. आता यावर पुढे काय निर्णय घेण्यात येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

“मनसुख हिरेन यांच्या हत्येनंतर माझ्या हत्येचा कट ठाकरे सरकार रचत आहे”

नितेश राणेंची प्रकृती खालावली; ‘ही’ महत्त्वाची माहिती आली समोर

“जागतिक स्तरावर नोंद घेतली जाईल, असं स्मारक राज्य सरकार आणि केंद्र सरकार तयार करेल”

“शिवाजी पार्क मैदानावर गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचं स्मृतीस्थळ उभारण्यात यावं”

बापलेकीचा भावनिक क्षण! सुप्रिया सुळेंनी स्वतःच्या हातांनी शरद पवारांना घातले बूट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More