मुंबई | सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे प्रकरणामुळे सध्या चर्चेत असलेल्या रेणू शर्मा यांचे वकिल रमेश त्रिपाठी यांच्यासंदर्भात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे.
रेणू शर्मा यांचे रमेश त्रिपाठी यांच्यावरच विनयभंगाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. 2018 साली वाशीच्या एपीएमसी पोलीस स्टेशनमध्ये रमेश त्रिपाठी यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे.
आपल्या महिला असिस्टंट वकिलावर विनयभंग केल्याचा त्यांच्यावर आरोप असून त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल असल्याचं समजतंय. रमेश त्रिपाठींवरच विनयभंगासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान, रमेश त्रिपाठी यांनी धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत इशारा दिला आहे. असे व्हिडिओ क्लिप्स आहेत आणि खूप गोष्टी आहेत, ते उघड झाल्यानंतर लोकांची तोंडं बंद होतील, असा इशारा त्रिपाठी यांनी मुंडेंना दिला आहे.
थोडक्यात बातम्या-
भाजप नेत्यामुळे धनंजय मुंडेंना राजकीय जीवदान; राजीनामा देणार नाहीत?
धनंजय मुंडे प्रकरणात IPS विश्वास नांगरे पाटील ‘ॲक्शन मोड’मध्ये!!!
‘तीने मला घरी नेलं आणि माझ्यासोबत…’; मनसेच्या मनिष धुरींनी दिली धक्कादायक माहिती
प्रत्येक गोष्टीसाठी लढणाऱ्या महिलांना कधीही कमजोर समजू नका- पंकजा मुंडे
नवाब मलिक मंत्री आहेत म्हणून जावयाने काहीही करावं का?- सुधीर मुनगंटीवार