बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

…अन् वरातीतील पाहुण्यानंच नवरीसोबत घेतले सात फेरे!

लखनऊ | उत्तर प्रदेश येथे एक अजब घटना घडली आहे. लग्ना दिवशी लग्नाला आलेल्या वरातीतील एका पाहुण्याने नवरीसोबत लग्नगाठ बांधली. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच चर्चा रंगली आहे.

उत्तर प्रदेशमधील नरवल येथे शुक्रवारी संबंधित लग्नसमारंभामध्ये वरमाळा घालण्याची वेळ आली आणि अचानक नवरदेव लग्नातून गायब झाला. ऐन समारंभातून नवरदेव गायब झाल्यानं सर्वच आश्चर्यचकीत झाले. या कारणामुळे वर-वधु दोन्ही पक्षांमध्ये तणाव निर्माण झाला. त्यानंतर नवरदेवाचा प्रचंड शोध घेण्यात आला. यादरम्यान नवरदेव गायब झाला नाही तर स्वतःच पळून गेला असल्याचं समोर आलं.

नवरदेव स्वतःच पळून गेला असल्याचं समजताच नवरीकडच्या लोकांची रडून परिस्थिती वाईट झाली. अखेर त्यांनी हे स्थळ सुचवणाऱ्या पाहुण्यांनाच गाठलं आणि या समस्येवर उत्तर मागितलं. यादरम्यान वरातीत नवरदेवासोबत आलेला एक तरुण नवरीसोबत लग्नासाठी तयार झाला. त्यानं नवरीच्या घरच्यांसमोर हा प्रस्ताव ठेवला. यानंतर वरातीत आलेल्या तरुणासोबतच नवरीबाईनं सात फेरे घेतले.

दरम्यान, संपूर्ण प्रकारानंतर दोन्ही पक्षांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे. मुलीकडच्या लोकांनी आधीच्या नवरदेवाविरोधात तक्रार दाखल केली आहे. तर मुलाच्या घरच्यांनी त्याला शोधण्याच्या मागणीसाठी पोलीस ठाणं गाठलं आहे. आता पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या-

लॉकडाऊनचे नियम मोडणाऱ्यांवर अनोखी कारवाई; वाचा सविस्तर…

घरात विलगीकरणासाठी जागा नाही; तरूणाने 11 दिवस झाडावर काढले

परदेशात नोकरी लावण्याचं आमिष दाखवून सव्वा महिना बलात्कार

“क्रिकेटपेक्षा शेतीच बरी, टीममध्ये कोचला महत्व नाही”

“वर्क फ्रॉम होम मुख्यमंत्र्यांनी स्वत:च इतकं मनावर घेतलं आहे की…”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More