बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

भारतीय सैन्याला मोठं यश! मोस्ट वाँटेड दहशतवादी अबू झरारचा खात्मा

श्रीनगर | पृथ्वीवरील सुंदर स्वर्ग पहायचा असेल तर जम्मू काश्मीरला (Jammu Kashmir) जावं असं म्हटलं जात. देशाचं शापित नंदनवन अशी उपमा सुद्धा काश्मीरला देण्यात आली आहे. कारणही तसंच याठिकाणी सतत दहशतवादी कारवाया (Terrior Activity) होतं असतात. परिणामी भारतीय सैन्याच्या (Indian Army) सर्वाधिक तुकड्या या भागात कार्यरत आहेत. अशातच भारतीय सुरक्षा बलानं एक मोठी दहशतवादविरोधी कारवाई पार पाडली आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मोस्ट वाॅंटेड दहशतवादी (Most Wanted Terrorist) म्हणून कुख्यात अबु झरारच्या (Abu Zarar) शोधात भारतीय सैन्य होतं. अशातच आता भारतीय सैन्यानं आपल्या कारवाईत पुंछ राजौरी जिल्ह्यात झरारचा खात्मा (Killed) केला आहे. ही भारतीय लष्कराची सर्वात मोठी कामगिरी आहे. काश्मीरमध्ये अनेक मोठ्या दहशतवादी कृत्यांमध्ये या झरारचा समावेश होता.

ऑगस्ट महिन्यात अबु झरार हा पुंछ जिल्ह्यात आढळला होता. तेव्हापासून भारतीय सैन्य त्याच्या शोधात शोधमोहिम राबवत होतं. जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया वाढवण्यासाठी आणि भारतीय लष्करावर हल्ले करण्यासाठी झरारला भारतात पाठवण्यात आलं होतं. भारतीय लष्कर आणि जम्मू काश्मीर पोलिसांच्या एकत्रित कारवाईत त्याचा खात्मा करण्यात आला आहे.

दरम्यान, गत काही दिवसांपासून पुंछ जिल्हात लष्करानं कारवाया वाढवल्या आहेत. अगदी 24 तासांमध्येच लष्कराच्या एका ताफ्यावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्याचा हिशोब भारतानं झरारला ठार करून चुकता केला आहे.

थोडक्यात बातम्या 

जॉन अब्राहमने उचललं धक्कादायक पाऊल?, चाहतेही झालेत हैराण

तुम्ही संभाजीनगर म्हणा, तुम्हाला न्यायालयात उभा करतो – गुणरत्न सदावर्ते

मोठी बातमी! लखीमपूर हिंसाचार प्रकरणी एसआयटीचा खळबळजनक खुलासा

“आता आम्ही पण बघणार, किसमें कितना है दम”; संजय राऊत आक्रमक

आणखी 2 बँकांचं खासगीकरण?, निर्मला सीतारमन यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More