नवी दिल्ली | केंद्र सरकारने जमीन मालकी कायद्यासंबंधी कायद्यामध्ये सुधारणा केली आहे. ज्यामध्ये भारतातील कोणताही नागरिकांसाठी दोन्ही केंद्र शासित प्रदेशांमध्ये जमीन घरेदी करता येणार आहे. मात्र काही जमिनी अद्यापही इतर नागरिकांना खरेदी करता येणार नाहीत.
कोणताही भारतीय व्यक्ती केंद्र शासित प्रदेशामध्ये जमीन खरेदी करू शकतो. मात्र कृषी जमिनीवरील बंदी अद्यापही आहे. शेतीसाठी इथल्या जमिनी मात्र फक्त स्थानिकांसाठीच असणार आहेत.
जम्मू काश्मीरला केंद्र शासित प्रदेश घोषित करून आता एक वर्ष पूर्ण होण्याच्या आधी या मोठा निर्णय घेण्यात आला आहे. 5 ऑगस्ट 2019च्या आधी, जम्मू-काश्मीर राज्यात स्वतंत्र घटनात्मक व्यवस्था होती, ज्यामध्ये फक्त राज्यातील कायमस्वरुपी नागरिकच तिथे जमीन खरेदी करू शकत होते.
दरम्यान, सप्टेंबर 2020 मध्ये जम्मू-काश्मीर प्रशासनाने अधिवास प्रमाणपत्र (प्रक्रिया) नियम 2020 मध्ये दुरुस्ती केली आहे.
Ministry of Home Affairs notifies UT of Jammu and Kashmir Reorganisation (Adaptation of Central Laws) Third Order, 2020. pic.twitter.com/cp00fIaSiJ
— ANI (@ANI) October 27, 2020
महत्वाच्या बातम्या-
दसरा मेळाव्याचं भाषण होतं की शिमग्याचं- चंद्रकांत पाटील
“सरकारने न्यायालयात योग्यरित्या बाजू मांडली, आज आमची मागणीही मान्य झाली”
‘पावसाळा संपला तरी बेडकांची डराव-डराव संपली नाही’; शिवसेनेचं पुन्हा राणेंवर टीकास्त्र
“मराठा आरक्षणाची सुनावणी चार आठवडे पुढे ढकलण्यात आली याला सरकार जबाबदार”
राष्ट्रवादी खासदार सुनिल तटकरे यांना कोरोनाची लागण
Comments are closed.