बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राज ठाकरेंच्या नावाखाली खंडणी मागितली; ‘या’ मराठी चित्रपट दिग्दर्शकाला अटक

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मराठी चित्रपटांसाठी आग्रही भूमिका मांडत असतात. आता मुंबईमध्ये राज ठाकरे यांच्या नावाचा वापर करून खंडणी मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष बाब म्हणजे चित्रपट निर्माते आणि निर्मात्याचाही यात समावेश आहे.

दिग्दर्शक मिलन वर्मा, चित्रपट निर्माता युवराज बोराडे तसेच सागर सोलंकर यांना पैसे मागितल्यावरून  मालवणी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. या आरोपींनी मढ येथील बंगल्याच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केली होती. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मारहाण करताना तू राजसाहेबांना ओळखत नाहीस का? तुला मुंबईत राहून मराठी बोलता येत नाही ? काम कोणाकरिता करतोस? असे एकावर एक प्रश्न विचारताना दिसत व्हिडीओत दिसत आहे.

या प्रकरणी पोलिसांनकडून एका मराठी अभिनेत्रीलाही नोटीस बजावण्यात आली आहे. ही मराठी अभिनेत्री मनसेची कार्यकर्ता असल्याचं सांगितलं जातयं. मारहाण केल्यानंतर सुरक्षारक्षकाने पोलिसांत धाव घेतली. त्यानंतर या तिघांना अटक करण्यात आली आहे.

दरम्यान, सुरक्षारक्षकाला मारहाण करून त्याच्याकडे पैशाची देखील मागणी केली होती. सदर घटनेचा व्हिडीओ आरोपींंनीच सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. मालवणी पोलिसांनी आयपीसी कलमाअंतर्गत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. राज ठाकरेंच्या नावाचा वापर पैसे मागण्यासाठी केल्यामुळे मनसेकडून अभिनेत्री आणि निर्मात्यांवर काय कारवाई करण्यात येते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

थोडक्यात बातम्या-

‘मला टाॅपलेस पंतप्रधान व्हायचंय’; तरूणीने व्यक्त केली अजब इच्छा

‘चला हवा येऊ द्या’ मधील ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्यानं सोडला शो; चाहत्यांना मोठा धक्का

युएईत रंगणार वर्ल्ड कपचा थरार; पाहा टीम इंडियाचं संपूर्ण वेळापत्रक

‘माझं शरद पवारांना आव्हान आहे की…’; किरीट सोमय्यांचं पवारांना खुलं आव्हान

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी सानिया मिर्झाचा मोठा निर्णय! व्हिडीओ शेअर करत म्हणाली…

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More