बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

आता कोरोनावर मात करण्यासाठी ‘या’ कॅप्सुलनं होणार उपचार

नवी दिल्ली | कोरोना महामारीच्या साथीनं तर जगभरात थैमान घातलं आहे. कोरोना आटोक्यात आला असला तरी अद्याप तो पूर्णपणे नष्ट झालेला नाही. त्यामुळे अजूनही कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता नाकारता येत नाही. याच पार्श्वभूमीवर सरकारकडून लसीकरण मोहिम राबवली जात आहे. नागरिकांना पुढे येऊन लस घेण्यास आवाहन केलं जात आहे.

कोरोनाला आळा घालण्यासाठी संशोधनातून नवनवीन औषध शोधली जात आहेत. वेगवेगळ्या प्रकारे संशोधन करुन कोरोनाला हरवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. अशातच आता कोरोना आटोक्यात आणण्यासाठी कोरोना कॅप्सुलचा उपयोग करता येणार आहे.

कोरोना लढ्यात आता मोलनुपिरावीर ओरल कॅप्सुलचा उपयोग करता येणार आहे. या कॅप्सुलच्या तिसऱ्या टप्प्यातली चाचणीही पूर्ण झाली आहे, याची माहिती औषध निर्माता ऑप्टिमस फार्मानं दिली आहे. त्यामुळे आता याविषयीचा फायनल निर्णय सल्लागार समिती घेणार असून 30 नोव्हेंबरला होणाऱ्या या बैठकीत आपत्कालीन वापरासाठी मंजूरी देण्यासाठी विनंती केली जाणार आहे.

दरम्यान, कोरोनासाठी अत्याधुनिक आणि फायदेशीर उपचार पर्याय विकसित करणं आणि कमीत कमी वेळेत रोगाचा प्रतिबंध करणं हे आमचे उद्दिष्ट असल्याचं, ऑप्टिमस फार्माचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डाॅ. श्रीनिवास रेड्डी यांनी म्हटलं.

थोडक्यात बातम्या – 

“…आणि दुर्दैवाने हा महाराष्ट्र मंत्रिमंडळात कौशल्य विकास मंत्री आहे”

‘त्या’ ट्विटवर नवाब मलिकांनी दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

दिवाळीमध्ये स्कीनला द्या आणखी ग्लो, करा ‘हे’ घरगुती उपाय

“लाडक्या आर्यनला बेल मिळाला, आता जनतेच्या प्रश्नांवर पत्रकार परिषद घेणार का?”

एकनाथ शिंदे यांना कुटूंबासह जीवे मारण्याची धमकी, काय आहे प्रकरण?, वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More