पुणे महाराष्ट्र

आता जे मला ट्रोल करत आहेत, तेच माझं काम पाहून कौतुक करतील- रोहित पवार

पुणे | राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी विधानसभा निवडणूक लढण्याचं जाहीर केल्यानंतर त्यांना ट्रोल करण्यात आलं. यावर उत्तर देत आता जे माला ट्रोल करत आहेत, तेच माझं काम पाहून कौतुक करतील असं रोहीत पवार यांनी म्हंटलं आहे. ते शनिवारी पत्रकार परिषदेत बोलत होते.

मला राजकारणात सक्रिय व्हायचं आहे. त्यामुळे ट्रोलर्सकडे लक्ष देऊन मी माझ्या चांगल्या कामात बाधा अणणार नाही, असंही रोहीत पवार म्हाणाले.

निवडणूक लढवण्यासाठी मी इच्छुक आहे आणि वरिष्ठ सांगतील त्या ठिकाणाहून मी निवडणूक लढवेल,  असं रोहित पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

याच पार्श्वभूमीवर रोहित पवारांना विधानसभेसाठी कोणत्या मतदारसंघातून संधी मिळते, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या

-पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये तुफान राडा; मतदान केंद्राबाहेरच मारामारी!

-पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सुरवात; ‘या’ दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला!

-“मनमोहन सिंहांचा रिमोट कंट्रोल गांधी घराण्याजवळ; त्यांना देशाची नाही तर खुर्चीची चिंता होती”

-राज्य सरकार दुष्काळाच्या मुद्द्यावर अतिशय गंभीर- चंद्रकांत पाटील

-कालच्या ‘थप्पड’ प्रकारानंतर केजरीवालांच्या दिल्लीतल्या ‘रोड-शो’ ला पोलिसांचा वेढा!

रोहित पवार हे आता कोणत्या ठिकाणाहून निवडणूक लढवतील, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहीलं आहे.

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या