बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“गंगा नदीच्या पाण्यात कोरोना व्हायरस टीकू शकत नाही”

नवी दिल्ली | कोरोना महामारीनं सगळीकडे खळबळ माजवली आहे. कोरोनाच्या बदलत्या रुपामुळे चिंतेचं वातावण निर्माण झालं आहे. त्यामुळे कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जात आहे. अशातच कोरोनावरील उपचारासाठी गंगा नदीच्या पाण्याचा वापर करणार असल्याचं समोर येत आहे.

गंगा नदी हिंदू धर्मातील एक पवित्र नदी म्हणून मानली जाते. याशिवाय गंगेत अंघोळ केल्यानं सर्व पाप नाहीसे होतात, अशीही एक मान्यता आहे. त्यामुळे आता कोरोनावरील उपचारासाठी पवित्र गंगेच्या पाण्याचा वापर करणार असल्याचं म्हटलं जात आहे. याविषयी केलेल्या अभ्यासातून कोरोना विषाणू हा गंगा नदीच्या पाण्यात टिकत नसल्याचं समोर आलं आहे.

या पहिलंही एका अभ्यासातून गंगा नदीच्या पाण्यामुळं कोरोना विषाणू मरत असल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर यावर आणखी संशोधन करण्यात आलं. लखनऊच्या नाल्यांच्या पाण्यामध्ये कोरोना विषाणू आढळून आला होता. पाण्यात कोरोना विषाणूचं निदान झाल्यामुळं वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या नद्यांमधील पाण्याची चाचणी करण्यात आली. यामध्ये गंगा नदीच्या पाण्याची चाचणी केली असता या पाण्यामध्ये कोरोना विषाणू टीकत नसल्याचं बीआरडी मेडिकल कॉलेजमधील व्हायरॉलॉजिस्ट अमरेश सिंह यांनी सांगितलं.

दरम्यान, एम्स येथील ऋषिकेश नावाच्या मुलानं हृषिकेशपासून वाराणसीपर्यंत गंगा नदीतील पाण्याची चाचपणी केली. या चाचपणीतून गंगा नदीच्या पाण्यात कोरोना विषाणू तग धरत नसल्याचं समोर आलं. याविषयी बोलताना अमरेश सिंह यांनी सांगितलं की, आयआयएममधील एका निवृत्त प्राध्यापक एनजीओसोबत मिळून गंगाजलचा उपयोग करून कोरोनावरील औषध बनवण्याचा प्रयत्न करत असून याविषयी संशोधन सुरु आहे.

थोडक्यात बातम्या –

कोरोनामुळे यंदाही गणेशोत्सव साधेपणानंच; भाविकांसाठी ऑनलाईन दर्शनाची होणार सोय

‘लोकशाहीच्या मंदिरात मार्शल लाॅ लावलाय’; राज्यसभेतील गदारोळानंतर राऊतांची टीका

‘मुख्यमंत्री तुम्हाला लाज वाटली पाहिजे’; महिलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

संभाजीराजेंना बोलू न दिल्यानं संजय राऊत भडकले, पाहा व्हिडीओ

“मराठा समाजाला आरक्षण द्यायचंय की नाही ते सांगा”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More