महाराष्ट्र मुंबई

…मग आता मुख्यमंत्र्याकडून दंड वसूल करणार का?; विरोधकांचा सवाल

कल्याण | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात प्लास्टिकच्या ग्लासांचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे प्लास्टिकचा वापर करणाऱ्या सरकारवर कारवाई करणार का?, असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.

राज्य सरकारकडून वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. त्याचा शुभारंभाचा कार्यक्रम नुकताच कल्याणच्या वरप गावात पार पडला. या कार्यक्रमातच प्लास्टिकचे ग्लास वापरण्यात आल्याचं दिसून आलं.

दरम्यान, राज्य सरकारनंच राज्यभरात प्लास्टिकवर बंदी आणली आणि त्यांच्याच कार्यक्रमात प्लास्टिकचा वापर दिसला. त्यामुळे विरोधकांनी सरकारकडून दंड वसूल करणार का?, असा प्रश्न उपस्थित केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

-अशोक चव्हाणांची गच्छंती अटळ?; काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ

-धक्कादायक!!! झोपलेल्या पत्नीचं नाक कापून पती फरार

-मी निधी आणला मात्र पंकजा मुंडेंनी अडवला- धनंजय मुंडे

-मोदींच्या योगासनाच्या व्हीडिओवर तब्बल 35 लाख खर्च!!!

-…हा तर एकनाथ खडसेंचा मोठेपणा- गिरीश महाजन

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या