बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पंतप्रधान नरेंद्र मोदींची टि्वटरवर कमाल; फॉलोअर्सची संख्या 7 कोटींवर

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटला 7 कोटी यूजर्सने फॉलो केलं आहे. नरेंद्र मोदी हे जगातील सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असणाऱ्या नेत्यांपैकी एक आहेत. सोशल मीडियावर त्यांची लोकप्रियता वाढत असल्याचं समोर आलं आहे.

नरेंद्र मोदी त्यांच्या फॉलोअर्सशी संवाद साधण्यासाठी आणि राजकीय वक्तव्यांसाठी ट्विटरचा वापर करतात. नरेंद्र मोदी यांचं फेसबुक अकाऊंट असून युट्युब चॅनेल देखील आहेत.

नरेंद्र मोदी सोशल मीडियाद्वारे त्यांना संदेश त्यांच्या फॉलओर्सपर्यंत पोहोचवतात. स्वच्छ भारत अभियान, महिला सुरक्षा, यासारख्या इतर अभियानांसाठी त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला आहे.

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वैयक्तिक अकाऊंटला 88.7 मिलियन म्हणजेच 8 कोटी 87 लाख लोक फॉलो करत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सक्रिय नेत्यांच्या यादीत दुसर्‍या क्रमांकावर होते. 2018 मधील आंतरराष्ट्रीय सर्वेक्षणानुसार नरेंद्र मोदी जगातील लोकप्रिय नेत्यांमध्ये पहिल्या तीनमध्ये होते.

थोडक्यात बातम्या-

दिलासादायक! महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत लक्षणीय घट, पाहा आकडेवारी

मुंबईकरांनी करुन दाखवलं! आज अवघ्या ‘इतक्या’ नव्या कोरोनाबाधितांची नोंद

सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ, वाचा ताजे दर

…अन् आराध्या बच्चनने अभिषेकऐवजी रणबीरला कपूरला बाबा म्हणून मारली मिठी

“मला न्याय मिळाला नाही तर मी धनंजय मुंडेंच्या दारासमोर आत्मदहन करेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More