बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली, रेणू शर्माची नार्को टेस्ट करा”

बीड | राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर रेणू शर्माने बलात्काराचे गंभीर आरोप केले होते. त्यामुळे मुंडे चांगलेच अडचणीत आले होते. मात्र गंभीर स्वरूपाचे आरोप करणाऱ्या रेणू शर्माने अचानक आपली तक्रार मागे घेतली. त्यामुळे या प्रकरणात शंका-कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर बीडच्या सर्वपक्षीय महिलांनी रेणूची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली आहे.

बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे आणि जिल्ह्याची मोठ्या प्रमाणात बदनामी झाली असून या प्रकरणात खरं काय आहे हे समोर यायला हवं. धनंजय मुंडेंनी तिच्यावर खरंच जर अत्याचार केला असेल तर तिने तक्रार का मागे घेतली? असं करणी सेनाच्या महिला प्रदेशाध्यक्ष अॅड संध्या राजपूत यांनी म्हटलं आहे.

या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी जर तिच्यावर दबाब येत असेल तर त्यासंदर्भात चौकशी झाली पाहिजे आणि रेणू शर्माची नार्को टेस्ट करण्यात यावी, अशी मागणीही बीडमधील भाजपा महिला आघाडी राष्ट्रवादी महिला आघाडी आणि करणी सेनाच्या महिलांनी केली आहे.

दरम्यान, रेणू शर्माने केलेल्या आरोपामुळे धनंजय मुंडेंचं मंत्रिपद धोक्यात आलं होतं. मात्र आता रेणूने तक्रार मागे घेतल्यामुळे तिच्यावरच खोटे आरोप केले म्हणून कारवाई व्हावी, अशी मागणी विरोधी पक्ष भाजपने केली आहे.

थोडक्यात बातम्या-

कोरोनाची लस घ्यायची असेल तर ही गोष्ट आत्ताच करा, नाहीतर येऊ शकते मोठी अडचण

लोकांसाठी झटणाऱ्यांना जनता कधीही विसरत नाही- शरद पवार

ब्राझीलच्या राष्ट्रपतींना आठवली संजीवनी; हनुमानाचा फोटो शेअर करत मानले मोदींचे आभार

खळबळजनक! चार शेतकरी नेत्यांची गोळ्या घालून हत्या करण्याचा कट; शुटरची जाहीर कबुली

क्रिकेटमध्ये सेक्स स्कँडल?; 20 वर्षीय क्रिकेटपटूला रंगेहाथ पकडल्यानं खळबळ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More