“न्यायालयाने भोंगे खाली उतरावायचे आदेश दिले आहेत त्याचं पालन करा आणि मग…”
मुंबई | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याचा इशारा दिला होता. जर भोंगे उतरवले नाही तर स्पीकरवर हनुमान चालीसा लावू, असं राज ठाकरेंनी म्हटलं होतं. रविवारी मनसे कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी हनुमान चालिसा लावली होती. त्यावरून गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांनी ( Dilip Walse Patil) मनसेला इशारा दिला आहे. अशातच मनसेकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आलं आहे.
मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे(Sandeep Deshpande) यांनी बोलताना गृहमंत्र्यांना न्यायालयाच्या आदेशाचं पालन करण्याचं आव्हान दिलं आहे. गृहमंत्र्यांनी कायदा कसा राबवायचा हे शिकलं पाहिजे. माझी सन्माननिय दिलीप वळसे पाटलांना विनंती आहे की, जे उच्च न्यायालयाचे आदेश आहेत त्यांचं पालन करा आणि मग आम्हाला धमक्या द्या. आम्ही आहोतच, आम्ही कुठे जाणार आहोत, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.
गृहमंत्र्यांच्या अशा धमक्यांना आम्ही घाबरत नाही. धमकी देणारे गृहमंत्री खूप बघितले आहेत. आम्हाला त्याचा काहीही फरक पडत नाही. आमची मागणी आहे की, कायद्याचं राज्य यावं आणि कायद्याचं पालन व्हावं, याचा त्यांनी पहिल्यांदा विचार केला पाहिजे, असंही संदीप देशपांडेनी म्हटलं आहे.
दरम्यान, सन्माननिय उच्च न्यायालयाने भूमिका घेतली आहे की, भोंगे उतरवले पाहिजेत. त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे. आम्हाला दम देणार, आमच्यावर कारवाई करणार. कोणत्याही कारवाईला महाराष्ट्र सैनिक घाबरणार नाही. गृहमंत्र्यांनी पहिल कायद्याचं पालन कराव आणि नंतर आम्हाला दम द्यावा, असं संदीप देशपांडे म्हणाले.
थोडक्यात बातम्या-
“राज ठाकरेंचा सगळा सिझनेबल कार्यक्रम, ते ऋतूप्रमाणे बदलणारे नेते”
“लग्न एकासोबत केलं आणि संसार दुसऱ्यासोबत, हे चांगलं नाही”
मोठी बातमी! माजी गृहमंत्री अनिल देशमुख रुग्णालयात दाखल
सोने-चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण, पाहा आजचे दर
मोठी बातमी! नवाब मलिकांना मोठा झटका, तुरुंगातील मुक्काम वाढला
Comments are closed.