बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन करायला गेले 100 जण, 21 जणांचा मृत्यू झाल्यानं खळबळ

जयपूर | कोरोनाने संपुर्ण देशात थैमान घातलं आहे. अनेकांनी आपला जीव गमावला आहे. अजूनही मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. यादरम्यान एक विचित्र घटना समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकाचा मृतदेह दफन करण्यासाठी अर्थात अंत्यसंस्कार करण्यास गेलेल्या लोकांपैकी एकूण 21 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

संबंधित घटना ही राजस्थानमधील खीरवा गावातील आहे. येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याचा मृत्यू गुजरातमध्ये झाला असून त्याला दफन करण्यासाठी खीरवा येथे आणण्यात आलं होतं. त्यावेळी त्याचा मृतदेह प्लॅस्टिकच्या बॅगमध्ये होता. मात्र लोकांनी त्याचा मृतदेह प्लॅस्टिकमधून काढून दफन केला. त्यानंतर अंत्यसंस्काराला आलेल्या 100 लोकांपैकी एकूण 21 जणांचा मृत्यू झाला.

राजस्थान काँग्रेस प्रमुख आणि राज्याचे शिक्षण मंत्री गोविंद सिंह डोटासरा यांच्या विधानसभा मतदार संघातील सीकरच्या खीरवा गावात ही घटना घडली असून अधिकार्‍यांनी सांगितलेल्या माहितीनूसार कोविड पीडित संक्रमिताचा मृतदेह 21 एप्रिलला गावात आणण्यात आला होता आणि 100 पेक्षा जास्त लोक अंत्यसंस्काराच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते, त्यावेळी कोविडच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करण्यात आले नाही.

दरम्यान, लक्ष्मणगढचे उप-विभागीय अधिकारी कुलराज मीना यांनी म्हटले आहे की 21 मृत्यूंपैकी कोविड-19 मुळे केवळ 3-4 जणांचेच मृत्यू झाले आहेत. इतरांचा मृत्यू वृद्धावस्थेमुळे झाला आहे. आम्ही 147 कुटुंबांचे नमूने घेतले आहेत. हे प्रकरण सामुदायिक प्रसाराचे आहे किंवा नाही याचा तपास केला जात आहे की नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

थोडक्यात बातम्या-

देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, जाणुन घ्या दिलासादायक आकडेवारी

संसदरत्न पुरस्काराने चार वेळा सन्मानित काॅंग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याची कोरोनावर मात

मुलांमधील ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका; बालरोग तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

धक्कादायक! अभिनेत्री आणि तिच्या बहिणीवर बलात्कार करुन केलं ‘हे’ लज्जास्पद कृत्य

आमच्यावर विश्वास ठेवा, कोरोना धोरण आखण्यात न्यायालयाच्या हस्तक्षेपाची गरज नाही- केंद्र सरकार  

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More