बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ अधिकाऱ्याची अजब मागणी, म्हणाले…,’मला घोड्यावरून ऑफिसला यायचंय’

नांदेड | लोकांना वेगवेगळ्या प्रकारची हौस असते. काहींना पारंपारिक कपडे घालण्यची इच्छा असते तर काहींना ब्राॅडेड गाड्यातून फिरण्याची इच्छा असते. पण नांदेडच्या एका अधिकाऱ्यानं एक अजबचं इच्छा प्रकट केली आहे. त्याच्या या इच्छेमुळे चक्क जिल्हाधिकारी ही बुचकळ्यात पडले. यामुळे जिल्हाधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सल्ला मागण्याची वेळ आली.

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील रोजगार हमी योजना विभागात सहाय्यक लेखाधिकारी म्हणून सेवेत असलेले सतिष पंजाबराव देशमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे एक पत्र पाठवून विनंती केली. या पत्रात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात घोडा बांधण्याची परवानगी सतिश देशमुख या अधिकाऱ्यांने मागितली. त्यांनी कार्यालयीन वेळात घोडा बांधण्याची बांधण्याची परवानगी मागितली होती.

या पत्रानंतर छोटाच पण चक्रावून टाकणारा मजकूर पाहून खुद्द जिल्हाअधिकारी चक्रावले. त्यांनी या प्रकरणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाताकडे  सल्ला मागितला आहे. हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाला असून हे पत्र चर्चेचा विषय ठरला आहे.

मला पाठीच्या कणाचा त्रास असल्याने गाडीवर येण्यास त्रास होत आहे. मी घोडा खरेदी करायचं ठरवलं आहे. घोड्यावर येऊन कार्यालयीन वेळेत पोहचणं शक्य होईल. कार्यालयीन परिसरात घोडा बांधण्याची परवानगी देण्यात यावी असा मजकूर या पत्रात अधिकाऱ्याने लिहिला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सतिश देशमुख यांचा विनंती अर्ज फेटाळून लावला आहे.

वाचा पत्र – 

 

थोडक्यात बातम्या-

‘सर्व पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा’; निवडणूक आयोगाचा आदेश

“उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे राहुल गांधी झाले आहेत”

…अन् लेकीचं शीर कापून तो थेट पोलीस ठाण्याकडे निघाला; घडलेला प्रकार पाहून पोलिसही हादरले

मोदी सत्तेत आल्यापासून भारतातील स्वातंत्र्य कमी झालं”; ‘ग्लोबल फ्रिडम’चा अहवाल

‘कल हो ना हो’ मधील जियाला ओळखणं झालंय कठीण, पाहा आता कशी दिसते

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More