बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अरे बापरे! फुकटचं सॅनिटायझर म्हणून आजोबांनी सॅनिटायझरनंच केली मालिश, पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | देशभरात कोरोनानं थैमान घातलं आहे. यातच सोशल मीडियावर आपल्याला रोज नवनवीन व्हिडीओ व्हायरल होताना दिसतात. त्यातील काही व्हिडीओ मजेशीर असतात, तर काही आपल्याला चकीत करणारे असतात. अशा व्हिडीओला प्रेक्षकांकडून भरपूर पसंती मिळत असते. काही व्हिडीओंना पाहून आपण अवाक् होऊन जातो. सध्या असाच एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

सध्या कोरोनाच्या परिस्थितीत काळजी घेण्यासाठी अनेक वेगवेगळे नुस्के वापरले जात असलेले पाहायला मिळतात. अशातच व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये दिसतय की, कार्यालयात आजोबांना सॅनिटायझर दिलं गेलं. त्यानंतर आजोबांनी तर आपलं डोकं, हात, पाय आणि चेहऱ्यावरही सॅनिटायजर लावलं. या व्हिडीओवर अनेकांनी मजेशीर कमेंट नोंदवल्या आहेत.

हा व्हिडीओ आयपीएस अधिकारी रुपिन शर्मा यांनी शेअर केला आहे. व्हिडीओ शेअर करीत त्यांनी मजेशीर कॅप्शनही लिहिलं आहे. त्यांनी लिहिलं आहे की, ‘इसका कोरोना बाल भी बाका नही कर सकता…पर #मास्क नीचे नहीं करना था चाचा’. हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशभरात थैमान घातलंय आहे. देशात कोरोना रुग्णांची वाढती संख्या आणि मृत्यूचं प्रमाण या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेची शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

विवाहीत प्रियकराला घरी बोलावून त्याचीच केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल धक्का

अरे बापरे! नवरदेवाला हळद लावण्यासाठी लढवली अनोखी शक्कल

कुलूप लावलेल्या घरात पत्नीनं पतीला प्रेयसीसोबत रंगेहाथ पकडलं पुढे झाला हाय होल्टेज ड्रामा

‘क्या हुवा तेरा वादा…जयंतराव जी’; जयंत पाटलांचा ‘तो’ व्हिडीओ शेअर करत चित्रा वाघ यांचं टीकास्त्र

मुंबईत प्रेमीयुगुलाने वृद्ध महिलेचा चिरला गळा, दीड महिन्यांनी धक्कादायक कारण आलं समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More