बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘उत्तर प्रदेश हे नवं जम्मू काश्मीर आहे’; माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुलांचं टीकास्त्र!

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशातील लखीमपूर खीरी येथे झालेल्या हिंसाचाराच्या घटनेमुळे देशभरात संतापाची लाट उसळून आली आहे. त्यामुळे देशातील राजकारण सध्या चांगलचं तापलेलं दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या शेतकरी आंदोलनादरम्यान घडलेल्या घटनेवर देशभरातून केंद्र सरकार आणि भाजपवर टीका केली जात आहे. उत्तर प्रदेश हे नवं जम्मू काश्मीर आहे, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे. ओमर अब्दुल्ला यांच्या प्रतिक्रियेवर सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आंदोलक शेतकरी दहशतवाद्यांसारखे वागत आहेत का?, असा प्रश्न सोशल मीडियावर नेटकऱ्याने विचारला आहे. यावर तर नाही सर, इथे धर्मांतर न केल्यास कोणालाही बळजबरीने राज्य सोडण्याची वेळ येत नाही, अशी प्रतिक्रिया देखील एका नेटकऱ्यांनी ओमर अब्दुल्ला यांच्या ट्विटवर दिली आहे.

दरम्यान, हिंसाचारामध्ये मृत पावलेल्या शेतकऱ्यांचे मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यावर सहमती झाली आहे. त्यांचं शवविच्छेदन डॉक्टरांच्या पॅनेलद्वारे व्हि़डीओग्राफीसह केलं जाईल. त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांना 40 लाख रूपये आणि 5 लाख रुपयांच्या विमाही काढून देण्यात येतील, असं लखनऊ पोलीस महानिरीक्षक लक्ष्मी सिंह यांनी सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

मुलगा ड्रग्ज प्रकरणात अडकल्यामुळे किंग खानने घेतला ‘हा’ मोठा निर्णय!

”घोटभर दारू, वाटीभर रस्सा आणि पाच वर्ष बोंबलत बसा”

‘आता वेळ आली आहे, मी लखीमपूर खेरी येथे जाणार’; असदुद्दीन औवेसी आक्रमक!

#लखीमपूर | “कोणा व्यक्तीचा जीव जात असेल, तर त्यास जबाबदार कोण?”

शाहरूखच्या लेकाच्या अडचणीत वाढ???; आर्यन खानला होऊ शकते 10 वर्षाची शिक्षा!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More