Top News देश

या दिवशी पंतप्रधान मोदी पुन्हा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार; लॉकडाऊन तसंच ‘या’ प्रमुख मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली |   पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केलेला देशव्यापी लॉकडाऊन 3 मे रोजी संपणार आहेत. लॉकडाऊन असून देखील कोरोनाचा कहर काही कमी होताना दिसून येत नाहीये. याच पार्श्वभूमीवर 27 एप्रिल रोजी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी मोदी पुन्हा एकदा व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.

या व्हीडिओ कॉन्फरन्सिंगमध्ये लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की टप्प्याटप्प्याने लॉकडाऊन शिथील करायचा? यावर दीर्घ चर्चा अपेक्षित आहे. कारण सध्या प्रत्येक राज्यामध्ये कोरोनाची सद्यस्थिती निरनिराळी आहे. त्यामुळे रूग्णसंख्या कमी अधिक असल्याने राज्यांचे मुख्यमंत्री लॉकडाऊनसंबंधी वेगवेगळे विचार मांडू शकतात. या सविस्तर चर्चेनंतर मोदी सगळ्यांना विश्वासात घेऊन आणि त्यांच्याशी सल्लामसलत करून लॉकडाऊनसंबंधी अंतिम निर्णय जाहीर करतील.

दुसरीकडे या चर्चेमध्ये राज्यांमध्ये कोरोनाबाधित रूग्ण तसंच मृत्यूदर, अनेक राज्यांमध्ये अडकलेले परप्रांतीय मजूर यांविषयी प्रमुख्याने चर्चा होणे अपेक्षित आहे. कारण विविध राज्यांमध्ये अडकलेल्या मजुरांचे सध्या खाण्यापिण्याचे हाल होत आहे. त्यांना घरी जाण्याची प्रतिक्षा लागून राहिलेली आहे. मात्र लॉकडाऊन असल्याने त्यांना घरी जाता येत नाहीये.

दरम्यान, लॉकडाऊनबरोबरच अर्थव्यवस्थेची गाडी पुन्हा रूळावर कशी आणता येईल, याचाही विचार या बैठकीत होऊ शकतो किंबहुना त्यावर देखील सविस्तर चर्चा अपेक्षित आहे. विविध राज्यांच्या ग्रीन झोनमध्ये उद्योग सुरू करण्याचा विचार किंवा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती देखील कळतीये.

ट्रेंडिंग बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार एकरकमी मिळणार; राज्य सरकारचा निर्णय

‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य

महत्वाच्या बातम्या-

गेहलोत सरकारचा मोठा निर्णय; 5 कोटी लोकांना वाटणार मोफत गहू

अवकाळी पावसाने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाचा दिलासा; दिले पंचनामे करण्याचे आदेश

…अशाने आकडेवारी कमी होईल पण धोका अधिक वाढेल- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या