महाराष्ट्र सांगली

एस.टी.वाचवा जनजागृती सभेचं आयोजन करून साजरा केला मुलीचा वाढदिवस

सांगली | एस.टी.वाचवा, एस.टी. वाढवा असा संदेश देत शिवराम ठवरे आणि सुनंदा पाटील यांनी मुलीचा वाढदिवस साजरा केला आहे. त्यांनी आपली मुलगी स्वरा हिच्या वाढदिवसानिमित्त तासगाव बसस्थानकात ‘एस.टी.वाचवा, एस.टी. वाढवा’ जनजागृती सभेचं आयोजन केलं होतं.

धोरणात्मक निर्णय न घेतल्यामुळे एसटी तोट्यात चालली आहे. लांब पल्याच्या गाड्या खाजगी लोकांच्या माध्यमातून चालवल्या जात आहेत, असं एस.टी.कामगार संघटनेचे नेते अ‌ॅड.के.डी.शिंदे यांनी म्हटलं आहे.

महाराष्ट्राच्या इतिहासातील सुवर्णकाळ अनुभलेली एसटी खाजगीकरणासाठी राज्यकर्ते अडचणीत आणत आहेत, असं विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे नेते डॉ.बाबुराव गुरव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जनजागृती सभेच्या वेळी गरिबांच्या हक्काची एसटी वाचवा एसटी वाढवा या पुस्तकाच्या 200 प्रतीचं मोफत वाटप करण्यात आलं.

महत्वाच्या बातम्या-

…तर देशभर फिरून अधिक तीव्र आंदोलन करणार- अण्णा हजारे

मुंडे साहेबांचा अपघात झाला की घात? हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांना पडलेला प्रश्न- धनंजय मुंडे

“…तर त्यांना बाटलीत बंद करुन अरबी समुद्रात टाकू”

“डोनाल्ड ट्रंम्प यांनीही केली नरेंद्र मोदींच्या राज्यकारभाराची प्रशंसा”

…यांना विकास नको फक्त सत्ता पाहिजे- देवेंद्र फडणवीस

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या