देश

ओवाळीते भाऊराया रे… लतादीदींच्या रक्षाबंधनानिमित्त खास पंतप्रधान मोदींना शुभेच्छा…!

मुंबई | आज रक्षाबंधन आहे. भाऊ-बहिणीचं अनोखं नात अजून घट्ट करण्यासाठीचा हा दिवस. भारताच्या कोकिळा आणि दिग्गज गायिका लता मंगेशकर यांनी रक्षाबंधनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. त्याच सोबत त्यांनी एक चित्रफीतही पाठवली आहे.

लता दीदींनी चित्रफीतमध्ये असं म्हणलंय की, आजच्या रक्षाबंधनाच्या पवित्र दिवशी मी तुम्हाला नमस्कार करते. मी तुम्हाला राखी का पाठवू शकत नाही, याच कारण संपूर्ण जगाला माहित आहे. नरेंद्र भाई तुम्ही देशासाठी खूप काम केलं आहे आणि त्या चांगल्या कामासाठी देश तुम्हाला कधीही विसरणार नाही. आज भारतातील करोडो महिला तुम्हाला राखी बांधण्याची इच्छा आहे. पण हे शक्य नाही, तुम्ही हे समजू शकता. पण तुम्ही आज एक वचन द्या की, तुम्ही आपल्या भारत देशाला प्रगतीपथावर घेऊन जाल.

 

 

या ट्विटवर पंतप्रधान मोदी यांनी उत्तर दिलंय की, लता दीदी तुम्ही रक्षाबंधनानिमित्त दिलेला हा संदेश खूपच प्रेरणादायी आणि ऊर्जा वाढवणारा आहे. करोडो महिलांच्या आशीर्वादाने आपला भारत देश नव्या उंची गाठेल आणि नवनवे यश संपादन करू. तुम्ही निरोगी राहाव्या आणि तुम्हाला दीर्घायुष्य लाभो, हीच देवाकडे प्रार्थना करतो.

 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि लता मंगेशकर यांचे संबंध खूपच चांगले आहेत. दोघेही ट्विटरवर वाढदिवसानिमित्त एकमेकांना नेहमी शुभेच्छा देत असतात आणि निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करत असतात.

महत्त्वाच्या बातम्या-

आम्ही तुकाराम मुंढेंच्या पाठीशी उभे आहोत- बाळासाहेब थोरात

…म्हणून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या मोठी, पण…- बाळासाहेब थोरात

शरद पवार आणि उद्धव ठाकरे अर्जुनासारखे गोंधळलेले, संभाजी भिडेंचं टीकास्त्र

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.