लखनऊ | उत्तर प्रदेशमधील गाजियाबादमध्ये उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या सौम्या पांडे यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. त्यानंतर 15 व्या दिवशीच त्यांनी पुन्हा कार्यालयात हजेरी लावली आहे.
कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी 26 वर्षीय सौम्या यांनी आपल्या लहान बाळाला घेऊनच कार्यालयात उपस्थित राहण्याचा निर्णय घेतला असून त्यांच्या या निर्णयाचं सध्या सर्व स्तरांमधून कौतुक होताना दिसत आहे.
सौम्या यांना मॅटर्निटी लीव्ह घेण्याची मूभा होती. मात्र त्यांनी सुट्टी घेण्याऐवजी आपल्या क्षेत्रामध्ये कोरोनावर नियंत्रण मिळवण्या संदर्भातील महत्वाचे दौरे सुरुच ठेवलेत.
महत्वाच्या बातम्या-
दिशाभूल करणाऱ्या कोडिंगच्या जाहिरातींना बळी पडू नका- वर्षा गायकवाड
“चांगल्या कामाला दिलसे पाठिंबा देणारे नेतेही विरोधी पक्षात आहेत, हे पाहून आनंद वाटला”
मोदी सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांना खास गिफ्ट; निर्मला सितारामन यांनी केली घोषणा
सत्ता लोकांना भ्रष्ट करत नाही, तर…- अमृता फडणवीस