बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फोटो शेअर करत एकनाथ खडसेंनी राज ठाकरेंना दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!

मुंबई | आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा जन्म दिवस असल्यामुळे त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांनी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

खडसे यांनी आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट करत राज ठाकरेंना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामध्ये त्यांनी राज ठाकरेंचा फोटो शेअर केला आहे. फोटो शेअर करताना त्याच्या खाली त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. राज ठाकरेजी आज आपला जन्मदिवस, त्यानिमित्त आपले मनःपूर्वक अभीष्टचिंतन असं लिहिलं आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूका तोंडावर आल्या आहेत. त्यामध्ये एकनाथ खडसे यांनी राज ठाकरेंना दिलेल्या शुभेच्छांमुळे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे हा पक्ष युती करणार का? असा सवालही उपस्थित केला जात आहे.

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी आपल्या फेसबुक आकाऊंटवरून एक पोस्ट केली होती. त्यामध्ये त्यांनी सध्या सगळीकडे जी परिस्थिती आहे. ती पाहता तुम्ही माझ्या वाढदिवसानिमित्त मला भेटायला येऊ नका असं आवाहन मनसे कार्यकर्त्यांना केलं होतं. मला अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मला पटत नसल्याचंही ते म्हणाले होते.

 

थोडक्यात बातम्या-

‘आताच्या घडीला भाजपला सशक्त पर्याय नाही’; काँग्रेसच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

“राज ठाकरेंच्या स्वप्नातला महाराष्ट्र फार वेगळा आहे, त्यांच्या हाती महाराष्ट्र दिला पाहिजे”

उपमुख्यमंत्री अजित पवार श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

‘कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले, तर…’; अभ्यासातून नवी माहिती समोर

भाई जगतापांची पोलिसांना धक्काबुक्की; भाई जगतापांसह 50 जणांवर गुन्हा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More