नवी दिल्ली | गुजरातमध्ये स्थानिक निवडणुका होणार आहेत. मात्र गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांनी उमेदवारीसाठीचे निकष जाहीर केले आहेत. या निकषांमध्ये 60 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले, नेत्यांचे नातेवाईक आणि महापालिकेत तीन वेळा कार्यकाळ पूर्ण केलेल्यांना तिकीट मिळणार नसल्याचं सांगितलं. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे बंधू प्रल्हाद मोदी यांनी जय शहांवर निशाणा साधला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे चिरंजीव जय शहा यांचं माझ्या आकलनानुसार क्रिकेटमध्ये कसलंही योगदान नाही मग त्यांना कुठल्या आधारावर बीसीसीआयच्या सचिव पदाची जबाबदारी दिली?, असा सवाल प्रल्हाद मोदी यांनी केला आहे.
क्रीडा क्षेत्रात काही कामगिरी बजावल्याचं कुठेही छापून आलेलं नसताना त्यांना क्रिकेट कंट्रोल बोर्डाची जबाबदारी देता येते. ते सरकारसाठी उपयोगी आहेत. भाजपकडून त्यांना सातत्याने पठिंबा मिळत असल्याचं प्रल्हाद मोदींनी सांगितलं. बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते.
दरम्यान, जर जय शहा बीसीसीआय बोर्डाचे सचिव होऊ शकतात तर मग पक्षाचं वागणं दुटप्पी असल्याचंही प्रल्हाद मोदींनी म्हटलं आहे.
थोडक्यात बातम्या-
“हे जय शहा… BCCI सोबत करारबद्ध असलेल्या क्रिकेटपटूंच्या अकाउंंटवरुन ट्विट करु नका
जनतेला सर्वात मोठा धक्का; LPG सिलेंडरच्या किंमती पुन्हा वाढल्या; पाहा नवे दर
“देशाच्या एकतेला प्राधान्य राहिल अशी सर्वांनी शपथ घ्यायला हवी
शिवेंद्रराजेंनी शशिकांत शिंदेंना दिलेल्या धमकीवर अजित पवार म्हणाले…
आदित्य ठाकरेंनी उडवली मनसेची खिल्ली, म्हणाले…
Comments are closed.