बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘नाद नाय करायचा राजेंचा’ भर कार्यक्रमात पुन्हा एकदा कॉलर उडवत केला डान्स

सातारा | खासदार उदयनराजे भोसले (MP Udyan Raje Bhosale) हे नेहमी त्यांच्या हटके अंदाजामुळे चर्चेत असतात. त्यांची कॉलर उडविण्याची स्टाईल तर सर्वत्र खूप प्रसिद्ध झाली होती. एकदा तर शरद पवारांनीही (Sharad Pawar) उदयनराजेंची कॉलर उडवून त्यांनी चेष्टा केली होती. त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा एका कार्यक्रमात तशीच कॉलर उडवली आहे.

उदयनराजे साताऱ्यातील दस्तगीर कॉलनीमध्ये एका कार्यक्रमासाठी गेले होते. यावेळी कार्यक्रमात उदयनराजेंवरच तयार केलेलं गाण लावण्यात आलं होतं. त्या गाण्यावर उदयनराजेंनी ठेका धरला. यावेळी उदयनराजेंनी आपली नेहमीची स्टाईल म्हणजेच कॉलर उडवत या गाण्यावर डान्स केला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

उदयनराजेंवर बनवण्यात आलेल्याच एका गाण्यावर उद्यनराजेंनी यावेळी ठेका धरला होता. ‘नाद नाय करायचा राजेंचा’ असा डायलॉग उदयनराजेंनी अनेकवेळा विरोधकांवर निशाणा साधताना मारला आहे. या डायलॉगवरच बनवलेल्या ‘नाद नाय करायचा राजेंचा’ हे गाणं कार्यक्रमात लावण्यात आले होते. या गाण्यावर डान्स करण्याचा मोह उदयनराजेंनाही आवरला नाही.

दरम्यान, उदयनराजे हे नेहमी त्यांच्या बिंधास्त आणि हटके स्टाईलमुळे चर्चेत असतात. त्यांनी केलेली वक्तव्यं हे एखाद्या सिनेमाच्या डायलॉगप्रमाणे हिट होतात. हे डायलॉग इतके प्रसिद्द होतात की यावर गाणी बनवून कार्यक्रमांना वाजवली देखील जातात. अशाच एका गाण्यावर उदयनराजे या कार्यक्रमात थिरकताना दिसले होते.

थोडक्यात बातम्या-

चिंताजनक! Omicronच्या धास्तीनं अनेक राज्यांत ‘या’ गोष्टीवर घातली बंदी

काँग्रेस मंत्र्याचा मंत्रीमंडळातून पत्ता कट?, नाना पटोेले म्हणतात…

पुन्हा लाॅकडाऊन लागणार का?, केंद्र सरकारचं राज्यांना तातडीचं पत्र

“अडीचपट जास्त पैसे दिले, पण संज्या म्हणेल…”, निलेश राणेंची खोचक टीका

“आदित्य ठाकरेंकडे मुख्यमंत्रीपदाचा चार्ज द्या”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More