बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

पाकिस्तानवरही कोरोनाचा ‘अ‌ॅटॅक’, घेतला पहिला बळी तर 184 जणांना कोरोनाची लागण

कराची| आधी चीन नंतर  युरोप नंतर  भारत अन् आता कोरोनानं पाकिस्तानमध्येही शिरकाव केला आहे. जगभरात हैदोस घालणाऱ्या कोरोनानं पाकिस्तानचं देखील मोठ्या प्रमणात नुकसान केलं आहे. पाकिस्तानमध्ये कोरोनामुळं एकाचा बळी गेला आहे तर 185 कोरोनाबाधित रूग्ण आढळले आहेत.

फक्त 24 तासांमध्ये 130 कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानं संपूर्ण देशात भितीचं वातावरण आहे. ज्या रूग्णाचा कोरोनामुळं मृत्यु झाला तो इराणहून परतला होता. त्याला पाकिस्तान सीमेवरील रूग्णालयात ठेवण्यात आलं होतं. लाहोरच्या एका रूग्णालयात त्याचा मृत्यू झाला. हा रुग्ण हफीजाबादचा रहिवासी होता.

पाकिस्तानच्या सिंध प्रांतांत तर तब्बल कोरोनाबाधित 155 रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या एका आठवड्यापासून कोरोना लागण झालेले रुग्ण आढळत आहेत. पहिल्या आठवड्यात पाकिस्तानात 33 रुग्ण सापडले आहेत. फक्त सोमवारी 133 रुग्ण आढळले होते.

विदेशी पर्यटकांना पाकिस्तानने बंदी घातली आहे. बुधवारी ही बंदी लागू होणार असून 3 एप्रिलपर्यंत ही बंदी असणार आहे.

ट्रेंडिंग बातम्या-

सर्व सरकारी कार्यालये 7 दिवस बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय

अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी मुंबई रेल्वेने लढवली नामी शक्कल!

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाने रेल्वेची चेन ओढली…. डेक्कन, प्रगती, हावडा, दुरांतो एक्सप्रेस या रेल्वे गाड्या रद्द!

प्रसिद्ध अभिनेते दिलीप कुमार यांना कोरोनाची लागण?

बाबासाहेब बघताय ना… गोगोईंच्या राज्यसभा नियुक्तीवर आव्हाडांचा निशाणा

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More