बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘या’ घोडचुकीने पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचाऱ्यांचं झालं निलंबन

नागपूर | नागपूरमध्ये 9 मार्चला 10 च्या सुमारास एक वयस्कर व्यक्ती गोरेवाडा भागातील एका निर्जन ठिकाणी जखमी अवस्थेत काही जणांना आढळला होता. त्यावेळी तिथून जाणाऱ्या संजय पांडे या पोलीस कर्मचाऱ्याला लोकांनी माहिती दिली. संजय पांडे यांनी घटनेची माहिती स्थानिक मानकापूर पोलीस ठाण्यात दिली. मात्र दुपार झाल्यानंतरही तेथीस स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक लाकडे, पोलीस कर्मचारी रोशन यादव आणि राहुल बोटरे न आल्याने चौघांनाही निलंबित करण्यात आलं आहे.

लोखंडे नगर भागात राहणारे 64 वर्षीय भैयालाल बैस 8 मार्च पासून राहत्या घरातून बेपत्ता होते. 9 मार्चला सकाळी 10 वाजताच्या सुमारास भैयालाल बैस हे जखमी अवस्थेत आढळले होते. लोकांनी पोलीस कर्मचारी संजय पांडे यांना माहिती दिली होती. मात्र संजय पांडे मानकापूर पोलीस स्टेशनचे पथक पोहोचण्याच्या आधीच तिथून निघून गेले होते. पोलीस उपनिरीक्षक लाकडे आणि इतर दोन पोलिस कर्मचारी जखमी भैयालाल यांचा 4 च्या सुमारास मृत्यू झाल्यावर घटनास्थळी पोहचले.

नागरिकांनी भैयालाल यांचा मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना सूचना दिली होती. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी येऊन मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टमसाठी पाठवला होता. भैयालाल यांच्या मृतदेहावर अनेक जखमा असल्यानं वैद्यकीय रिपोर्टच्या आधारे 11 मार्च रोजी पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला होता.

दरम्यान, एका पोलीस कर्मचाऱ्याने जखमी अवस्थेत वृद्ध आढळल्यानंतरही पोलीस पथक तिथे येईपर्यंत थांबणं योग्य समजलं नाही. माहिती मिळूनही मानकापूर पोलीस स्टेशनचे अधिकारी आणि कर्मचारी वेळेत तिथे पोहोचले नाही, परिणामी एका जेष्ठ नागरिकाला प्राण गमवावे लागले. या प्रकारामुळे पोलीस आयुक्तांनी घटना गांभीर्याने घेत प्राथमिक चौकशी केली आहे. त्यानंतर एक पोलीस उपनिरीक्षक आणि तीन पोलीस कर्मचारी यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे.

थोडक्यात बातम्या

‘सरकार पाडण्यासाठी भाजप नेते पोते भरून पैसे घेऊन हेलिकॉप्टरने आले’; माजी मुख्यमंत्र्यांचा शहांवर आरोप 

पुण्यात कोरोनाच्या रूग्णांमध्ये वाढ; पुन्हा आढळले 1 हजारांहून अधिक रूग्ण

जॉनी बेयरस्टोला वॉशिंग्टन सुंदर भिडला, भर मैदानात ‘राडा’, पाहा व्हिडिओ

काँग्रेस सर्वात भ्रष्टाचारी पक्ष आहे, तुम्ही भाजपला मत द्या- स्मृती इराणी

“काँग्रेस-राष्ट्रवादीने मराठा समाज कधीही पुढे जाणार नाही याची काळजी घेतली”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More