बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

Share Market: लाखाचे केले 5 कोटी!; ‘या’ शेअरनं करुन दिली छप्परफाड कमाई

नवी दिल्ली | कोरोना महामारीचा सर्व क्षेत्रांना फटका बसला आहे. अशातही शेअर बाजार (Share Market) हे एकमेव क्षेत्र आहे ज्यामध्ये सध्या चांगली कामगिरी होत आहे. अनेक व्यवसाय कोरोनाच्या काळात ठप्प होते पण शेअर बाजारात मात्र तेजी कायम होती. परिणामी गुंतवणुकदारांना (Investors) काही शेअर्सच्या माध्यमातून मोठा रिटर्न मिळाला आहे. यातही एका शेअरनं तब्बल 200 पट मोठी झेप घेतली आहे.

गुंतवणुकदारांना जबरदस्त रिटर्न देण्यात फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक्स (Flomic Global Logistics) या कंपनीचा शेअरचा समावेश आहे. हा शेअरसुद्धा देखील भारतातील मल्टीबॅगर स्टॉकपैकी एक आहे. हा मल्टीबॅगर स्टॉक एक पेनी स्टॉक (Penny Stock investments) आहे. या स्टॉकची किंमत 0.35 पैसे प्रति शेअरवरुन 198.45 रुपये प्रति शेअरवर पोहोचली आहे. जवळपास 3 वर्षात हा शेअर 567 पटींनी वाढला आहे.

या मल्टीबॅगर पेनी स्टॉकच्या शेअरच्या किंमतीच्या इतिहासावर (Share Price History) नजर टाकल्यास, हे समजते की फ्लोमिक ग्लोबल लॉजिस्टिक शेअरची किंमत गेल्या 6 महिन्यांत 10.37 रूपयावरून 198.45 रूपयांपर्यंत वाढली आहे. या कालावधीत हा शेअर सुमारे 1,913 टक्क्यांनी वाढला आहे. परिणामी सध्या या शेअरची चर्चा बाजारात जास्त आहे.

दरम्यान, जर एखाद्यानं तेव्हा 1 लाख रूपये गुंतवले असते तर त्यांला आत्ता तब्बल 5 कोटी मिळाले असते. ग्लोबल लाॅजिस्टीक लिमीटेड ही कंपनी जगभरात काम करते. गोदाम व्यवस्था पुरवणे, माल वाहतुक करणे ही काम या कंपनीकडून करण्यात येतात.

थोडक्यात बातम्या 

“आता आम्ही पण बघणार, किसमें कितना है दम”; संजय राऊत आक्रमक

आणखी 2 बँकांचं खासगीकरण?, निर्मला सीतारमन यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती

“शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची वोटबँक तयार केली, त्यावर मोदींनी कळस चढवला”

“प्रकरण बाहेर आलं तर फटाक्यांची माळ लागेल”, राज ठाकरेंचा नेमका रोख कुणाकडे?

“कोण कोणाला सडवतोय हे आता उद्धव ठाकरेंना कळलं असेल”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More