बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शाहिद कपूरच्या बायकोची ऑनलाईन फसवणूक; फोटो शेअर करत म्हणाली…

मुंबई | अभिनेता शाहिद कपूरची बायको मीरा राजपूतही अभिनेत्रींप्रमाणेच नेहमी चर्चेत असलेली पाहायला मिळते. ती सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत मीरा चाहत्यांच्या संपर्कात राहते. अशातच आता मीराची एक पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तीनं तिच्यासोबत झालेल्या आॅनलाइन फसवणूकीविषयी सांगितलं आहे.

आॅनलाईन फसवणूकीविषयी मीरानं म्हटलं की, एक जाहिरात पाहून मी हे फोन कव्हर आॅनलाईन विकत घेतले, जाहिरातीमध्ये जे कव्हर दाखवले होते ते पाहून मी कव्हर मागवले होते. परंतु मला पाठवण्यात आलेले ते हे कव्हर नाही.

पुढे मीरा म्हणाली की, हे प्लास्टिकचे कव्हर आहे. मला एक स्लिंग कव्हर पाहिजे होते,जेणेकरून बाहेर फिरायला जाताना मला बॅग घेऊन जायची गरज पडणार नाही. (हो, माझ्या पॅन्टला खिसे नाहीत).

दरम्यान, बी-टाऊनमधलं हे जोडपं सर्वाधिक लोकप्रिय आहे. दोघंही सोशल मीडियाच्या माध्यमातून आपले मजेशीर, कौटुंबिक फोटो चाहत्यांसाठी शेअर करत असतात. सर्वात मीरा फिल्म इंडस्ट्रीपासून लांब आहे पण तिच्या स्टयलिंग आणि कडक फॅशन सेन्समुळे ती सतत चर्चेत असते.

थोडक्यात बातम्या – 

“मला आणि कराडांना गोपीनाथ मुंडेंनीच घडवलं, आम्ही साहेबांचेच कार्यकर्ते”

खुशखबर! आता पेट्रोल-डिझेल लवकरच स्वस्त होणार? जाणून घ्या काय आहे कारण

“मोदी सरकारने देश उध्वस्त करायचं ठरवलं असेल तर काय करणार?”

“ईडीच्या माध्यमातून एकनाथ खडसेंची सुडबुद्धीने आणि राजकीय हेतूने चौकशी सुरू आहे”

…म्हणून भाजपच्या 12 आमदारांना निलंबित करण्यात आलं – देवेंद्र फडणवीस

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More