फक्त याच ठिकाणी 14 दिवसांचा कडक लाॅकडाऊन; केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचना जाहीर
मुंबई | देशातील विविध राज्यात कोरोना महामारीने थैमान घातलं आहे. महाराष्ट्र सरकारने नुकतेच राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. तर आता कर्नाटक, दिल्ली, राजस्थान ही राज्येे लाॅकडाऊन लागू करत आहेत. लाॅकडाऊनमुळे आर्थिक संकटाला सामोरं जावं लागत आहे. लाॅकडाऊनचा परिणाम सरकारी तिजोरीवर आणि सामान्यांच्या खिश्यावर होऊ नये, त्यामुळे आता केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
ज्या भागांमध्ये कोरोनाचा पॉझिटिव्हिटी दर हा एका आठवड्यापासून 10 टक्क्यांहून अधिक आहे आणि हॉस्पिटल्समधील बेड हे 60 टक्क्यांहून अधिक भरलेले असतील तरच त्या भागांमध्ये 14 दिवसांचा कडक लॉकडाऊन घोषित करावा, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे. तर राज्य सरकारांनी निर्बंधांचे कडक पालन करून नागरिकांवर सक्ती केली पाहिजे, असंही सांंगण्यात आलं आहे.
संचारबंदीचा कालावधी निश्चित करण्याची सूट स्थानिक प्रशासनाला द्यावी. रात्रीच्या संचारबंदीत जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व वाहतूक पूर्णपणे बंद करावी. त्याचबरोबर सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शिक्षण, सांस्कृतिक, धार्मिक आणि उत्सवांसारख्या गर्दी होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी घालावी. नागरिकांच्या भेटी-गाठी रोखल्यानेच कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव थांबवला जाऊ शकतो त्यामुळं, लग्न सोहळ्यांमध्ये 50 आणि अंत्यसंस्कारावेळी 20 नागरिकांना परवानगी द्यावी, असं केंद्र सरकारने सांगितलं आहे.
दरम्यान, शॉपिंग कॉम्प्लेक्स, चित्रपटगृह, रेस्टॉरंट-बार, क्रीडा संकुल, जिम, स्पा, स्विमिंग पूल आणि धार्मिक स्थळांवर बंदी घालावी. त्याचबरोबर सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील आवश्यक सेवाच फक्त सुरू ठेवाव्यात. आंतरराज्य किंवा राज्यांतर्गत वाहतुकीवर बंदी घालू नये. आवश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांना अजिबात अडवू नका, असंही केंद्राने स्पष्ट केलं आहे.
थोडक्यात बातम्या-
महाराष्ट्रातील लाॅकडाऊन वाढणार का?; टास्क फोर्सच्या सदस्यांचं मोठं वक्तव्य
नगरसेविकेच्या मुलाला पुणे पोलिसांकडून अटक, कारण अत्यंत धक्कादायक
महाराष्ट्राने नोंदवला एका दिवसातील कोरोना लसीकरणाचा नवा विक्रम
विश्वासाचं दुसरं नाव टाटा… देशवासियांना दिलेला शब्द चौथ्याच दिवशी पूर्ण केला!
कोलकाता आता आहे तय्यार! कोलकाताचा पंजाबवर 5 विकेट्सने विजय
Comments are closed.