बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘जैश ए हिंद या नावानं…’; अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकं प्रकरणी फडणवीसांचा गंभीर आरोप

मुंबई | देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींच्या घराबाहेर स्फोटक असलेली कार आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली होती. स्फोटकांनी भरलेली गाडी उभी करून जाणाऱ्या लोकांचा शोध मुंबई पोलीसांकडून घेतला जात आहे. मात्र या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे देण्यात यावा, अशी मागणी आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या घटनेसंबंधी शंकेला अनेक पुरावे समोर आल्याचंही फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं आहे.

विधानसभेत बोलताना फडणवीस म्हणाले की, अंबानींच्या घरासमोर एक गाडी सापडली. स्फोटकांनी भरलेली गाडी सापडल्यावर टेलीग्रामवर एक ग्रुप तयार करण्यात आला होता. या ग्रुपवर ‘जैश ए हिंद’ या नावानं एक मॅसेजही करण्यात आला होता.

तसेच घटनेच्या ठिकाणी एक नाही तर दोन गाड्या असून गाडी ओळखल्याबरोबर श्री सचिन वझे ( पोलिस अधिकारी ) घटनेच्या ठिकाणी सर्वात आधी पोहचले होते. ज्यांची गाडी चोरीला गेली, त्याच्याशी एका क्रमांकावर अनेक वेळा संवाद चालू होता. वझे आणि गाड्या ठाण्यातील असून या दोघांचे आधीपासून संवाद असल्याचंही फडणवीसांनी सांगितलं आहे.

दरम्यान पेडर रोडवर असणाऱ्या मुकेश अंबानी यांच्या घरासमोर त्यांच्या गाडीशी मिळता जुळता नंबर असलेल्या नंबरची स्कॉर्पिओ गाडी नो पार्किंगच्या फलकाखाली लावण्यात आली होती. सदरील गाडीमध्ये 20 जिलेटीनच्या कांड्या आणि एक निनावी पत्र होतं ज्यामध्ये ‘ही फक्त झलक आहे’, असा उल्लेखही करण्यात आला होता.

थोडक्यात बातम्या –

कुणी म्हणाले वेडी कुठली, कुणी म्हणाले खुळी… अमृता फडणवीस यांच नवं गाणं

‘जिल्हा परिषदांमधील आरक्षणाचा फटका ओबीसी बांधवांना बसू नये म्हणून…’; अजित पवारांनी केलं मोठं वक्तव्य

“मोदी सरकारची चमचेगिरी करणाऱ्यांच्या उलाढाली स्वच्छ आहेत काय?”

…अन् राज ठाकरेंनी माजी महापौरांना देखील मास्क काढायला लावला!

‘टुरिस्ट गाईड’ बनायचंय? राज्य सरकारचा हा ऑनलाईन कोर्स लवकरच सुरू होणार; सविस्तर वाचा…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More