बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

फिरसे मौका मौका! भारत-पाकिस्तान पुन्हा भिडणार, ‘या’ तारखेला होणार सामना

मुंबई | क्रिकेट म्हणजे भारतात एक प्रकारचा उत्सवच असतो आणि त्यात भारत आणि पाकिस्तान यांचा सामना असेल तर ‘सोने पे सुहागा’. भारत आणि पाकिस्तान यांच्यातला सामना पाहण्याची संधी गेल्या काही वर्षांपासून क्रिकेटप्रेमींना क्वचितच मिळाली आहे. मात्र, आता भारत पाकिस्तान सामना पाहण्याची संधी क्रिडाप्रेमींना मिळणार आहे. पुन्हा भारत आणि पाकिस्तानचे संघ आमने सामने येणार आहे.

युएईमध्ये अंडर-19 आशिया चषक स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. या आशियाई चषक स्पर्धेत भारत, पाकिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका नेपाळ, युएई, अफगाणिस्तान आणि कुवेत हे संघ सहभागी असणार आहेत. येत्या 23 डिसेंबरपासून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे. त्यात 25 डिसेंबरला भारत आणि पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत.

अंडर-19 आशिया चषक स्पर्धेसाठी बीसीसीआयने 20 सदस्यांची देखील निवड केली आहे. सध्या या स्पर्धेत भारत विश्वचषकाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तर पाकिस्तान देखील भारताला चांगली टक्कर येऊ शकते. त्यामुळे आता भारत पाकिस्तान सामन्यात चांगलीच रंगत येणार असल्याचं दिसतंय.

दरम्यान, हरनूरसिंग पन्नू, अंगकृष्ण रघुवंशी, अंश गोसाई, एसके रशीद, यश धुल्ल (कर्णधार), अन्नेश्वर गौतम, सिद्धार्थ यादव, कौशल तांबे, निशांत सिंधू, दिनेश बाना (विकेटकीपर), आराध्या यादव (विकेटकीपर), राजनगड बावा, राजकुमार हंगेगर गरव सांगवान, रवी कुमार, ऋषिथ रेड्डी, मानव पारख, अमृत राज उपाध्याय, विकी ओस्तवाल, वासू वत्स, असा भारताचा संघ असणार आहे.

थोडक्यात बातम्या-

“दादा बघा, दादा बघा…अरे दादाला इथली अंडी पिल्लं माहितीये”, अजित पवारांची टोलेबाजी

“साथियो, सुना है मेरे घर सरकारी मेहमान आने वाले है”, मलिकांच्या ट्विटने खळबळ

“…तर भाजप आम्हाला लांब नाही”, जितेंद्र आव्हाडांचं मोठं वक्तव्य

फक्त ‘या गोष्टीवर’ बंदी आणा; वानखेडे दांपत्याची न्यायालयात धाव

“धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून ताबडतोब काढून टाका”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More