बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

शरद पवार यांच्यासोबत क्रिकेट सामना पाहण्याची संधी, रुपाली चाकणकर म्हणतात…

मुंबई | सध्या न्यूझीलंड आणि भारतीय क्रिकेट संघ (IndVsNz) यांच्यात वानखेडे स्टेडियम येथे कसोटी सामना सुरू आहे. दोन कसोटी सामन्याच्या या मालिकेतील दुसरा कसोटी सामना (Test Match) खेळवला जातोय. हा सामना पाहण्यासाठी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि राष्ट्रीय महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी हजेरी लावली होती. त्यानंतर त्यांनी फेसबुकवर भावनिक पोस्ट लिहिली आहे. (Rupali Chakankar has written an emotional post on Facebook)

आज आदरणीय शरद पवार साहेबांसोबत वानखेडे स्टेडियम येथे जाण्याचा योग आला. आयुष्यातील स्वप्नांपैकी एक सोनेरी स्वप्न आज पूर्ण झाले. शरद पवार साहेबांनी क्रीडा क्षेत्रात केलेलं कार्य उत्तुंग आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय, आयसीसी (BCCI, ICC) या संघटनांच्या माध्यमातून भारतीय क्रिकेटला यशाच्या शिखरावर नेण्याचं काम शरद पवार साहेबांनी केलं आहे, अशा भावना रूपाली चाकणकर यांनी प्रकट केल्या आहेत.

शरद पवार साहेबांच्या उपस्थित या मैदानावर झालेले क्रिकेटचे सामने लहानपणापासून फक्त टीव्हीवर पाहत आले. अनेक देशांचे संघ भारतात खेळण्यासाठी उत्सुक असतात. आज प्रत्यक्ष या माझ्या दैवतासोबत उपस्थित राहून पाहण्याचा योग आला, असं म्हणत चाकणकरांनी शरद पवारांचे आभार देखील मानले आहेत.

दरम्यान, शरद पवार आणि क्रिकेट हे नातं फार जुनं आहे. ते आपण पदोपदी पाहिलं देखील आहे. शरद पवारांनी बीसीसीआय तसेच आयसीसीच्या अध्यक्षपदाची देखील धुरा सांभाळली होती. अशातच शरद पवारांनी आज वानखेडे स्टेडियम हजेरी लावत सामन्याचा आनंद लुटला आहे.

थोडक्यात बातम्या-

एसटी कर्मचाऱ्यांवर सर्वात मोठी कारवाई होणार, मुख्यमंत्री घेणार अंतिम निर्णय

लवकर वसतिगृहे चालू करा! स्टुडंट हेलपिंग हँड व छात्रभारतीचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

कंगनाला शेवटी माफी मागावीच लागली, शेतकऱ्यांनी अडवली गाडी अन्…; पाहा व्हिडीओ

देवेंद्र फडणवीसांना वाटते ‘या’ गोष्टीची भीती, स्वत:च केला खुलासा

विराट कोहली Out की Not Out?, अंपायरच्या निर्णयानंतर वाद पेटला; पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More