बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

हिवाळी अधिवेशन: आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीवर फडणवीसांची प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्याामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. धमकी देणाऱ्याला पोलिसांनी बंगळुरुहून अटक केली आहे. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) देखील आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीवर प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेना नेते सुनील प्रभू यांनी सभागृहात आदित्य ठाकरेंना आलेल्या धमकीचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी फडणवीसांनी सभागृहात या घटनेचा निषेध करतो, असं म्हटलं आहे. शिवाय “या प्रकरणात सहकार्य मिळत असेलं तर मी स्वत: कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानां भेटून चर्चा करेल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

“मंत्र्यांना कोणी धमकी देत असेलं तर त्याला ठेचलं पाहीजे. या गंभीर प्रकरणाला राजकिय करण्याचा प्रयत्न सुनील प्रभु यांनी केला. गुन्हेगार हे गुन्हेगार असतात. त्याला राजकिय वळण देता कामा नये. ट्विटर व जे ट्रेंडींग झालं. त्यांची चौकशी करा अशी मागणी आहे,” असंही फडणीवासांनी यावेळी म्हटलं आहे.

दरम्यान, मुंबई क्राईम ब्रँच पोलिसांनी धमकी देणाऱ्या जयसिंग राजपूत या व्यक्तीला बंगळुरूहुन अटक केली आहे. आदित्य ठाकरे यांना धमकी देणारा दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मोठा चाहता आहे. ‘सुशांत सिंह राजपूतला तु मारलं, आता नंबर तुझा’, असा मेसेज राजपूतने आदित्य ठाकरे यांना केला होता.

थोडक्यात बातम्या-

धक्कादायक! पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी

पीएम किसान योजनेचा लाभ मिळवण्यासाठी KYC कशी करायची? वाचा सविस्तर

राजकारणातील गुन्हेगारीला आळा बसणार; निवडणूक आयोगाने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

शेतकऱ्यांसाठी खूशखबर! पीएम किसान योजनेतील तिसरा हप्ता मिळण्याची तारीख जाहीर

‘स्वतःचे अपयश झाकण्यासाठी त्यांना अशा नकला कराव्या लागत आहे’; दानवेंची सरकारवर बोचरी टीका

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More