बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘पन्नास खोके माजलेत बोके’, सरकारविरोधात विरोधकांची जोरदार घोषणाबाजी; पाहा व्हिडीओ

मुंबई | विधिमंडळ अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विरोधकांनी सराकरविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यावर शिंदे सरकारविरोधात नव्या घोषणा देत सरकारला फैलावर घेतलं.

पन्नास खोके, माजलेत बोके, पन्नास खोके, एकदम ओके, ईडी ज्याच्या घरी तो भाजपच्या दारी, स्थगिती सरकार हाय हाय, गद्दारांचं सरकार हाय हाय, अशा घोषणा देत विरोधकांनी सरकारवर सडकून टीका केली.

दरम्यान, सत्तापालट झाल्यानंतर विधिमंडळ अधिवेशनात विरोधक व सत्ताधारी आमनेसामने आले आहेत. जनतेमधून नगराध्यक्ष निवडून आणण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रस्तावावरून विरोधक आणि शिंदे सरकारमध्ये जुंपलेली पाहायला मिळत आहे.

पाहा व्हिडीओ-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More